एअर इंडियाची विमानसेवा स्थगित

17

मुंबई : सध्या जगभरात हाहाकार माजविणाऱ्या कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर एअर इंडियाने आपली आंतरराष्ट्रीय विमानसेवा स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. अशी माहिती देण्यात आली आहे.
मुंबईवरून रवाना होणाऱ्या मुंबई-कुवेत-मुंबई व मुंबई-कोलंबो-मुंबई या दोन विमानसेवा नव्याने स्थगित करण्यात आल्या आहेत.
याआधीच रोम व मिलान शहरासाठीच्या सेवा बंद केल्या असून, स्थगिती ३० एप्रिलपर्यंत असेल.
तर दिल्लीहून माद्रिद-चार्ल्स डी गॉल-फ्रॅन्टफर्ट व तेल अवीव, चेन्नई, अहमदाबाद आणि हैदराबादहून कुवेतच्या सेवादेखील ३० एप्रिलपर्यंत बंद असतील.
या दरम्यान, दिल्ली, हैदराबाद, मुंबई, चेन्नई, गोव्याहून रवाना होणाऱ्या विमानसेवांचा बंदमध्ये समावेश आहे.