छगन भुजबळांनीच मोडला सरकारचा नियम

पुणे: सरकारने राज्यात सर्वत्र गर्दी एकत्र न करणे, समारंभ टाळणे आणि जमाव जमवू नये, यासाठी आवाहन केले असताना देखील राज्याचे अन्न पुरवठा मंत्री छगन भुजबळ मात्र पुण्यात जाहीर कार्यक्रमात पाहायला मिळाले. मात्र, याच आदेशाला पुण्यातील ससाणे एज्युकेशन सोसायटीच्या संस्थाचालकांकडून केराची टोपली दाखविण्यात आली असल्याचे समोर येत आहे.
विशेष म्हणजे या कार्यक्रमाला हजेरी लावत मंत्री छगन भुजबळ यांनी आदेशाचे पालन न करता शाळेचे उद्घाटनही केले.
‘ससाणे एज्युकेशन सोसायटीच्या न्यू इंग्लिश स्कूल इमारतीचे आणि क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले, महात्मा फुले यांच्या पुतळ्याचे उद्घाटन करण्याचे नियोजन दोन वेळा ठरले होते. आजचा कार्यक्रम देखील फार पूर्वीच नियोजन केले होते. त्यामुळे आज कार्यक्रमाला आलो आहे. त्यामुळे या ठिकाणी कोणत्याही प्रकाराचे भाषण करणार नसून, प्रत्येकाने काळजी घ्यावी, असंही भुजबळ म्हणाले.
शाळेचे उदघाटन मंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते करण्यात आले. करोनाचा प्रसार रोखण्यासाठी एका बाजूला राज्य सरकारने शाळांना सुट्टी दिली आहे, तर दुसरीकडे अशा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
याप्रकरणी आदेशाचे पालन न करणाऱ्या संस्थाचालक, शिक्षक यांच्यावर कडक कारवाई केली जाईल, असे आदेश देण्यात आले आहेत.
आता संबधित मंत्री आणि संस्था चालक यांच्यावर काय कारवाई केली जाते, याकडे सगळ्यांचं लक्ष लागले आहे.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा