पोंगयांग: कोरोना व्हायर्सने सध्या जगभरात धुमाकूळ घातला आहे. कोरोनामुळे जगभरात जवळपास ५००० नागरिकांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे जगातील अनेक देशात हा व्हायरस पसरल्याने सर्वत्र दहशतीचे वातावरण आहे. जगभरात हा व्हायरस वेगाने पसरत असल्याने असंख्य लोकांना याची लागण झाली आहे. या पार्श्वभूमीवर उत्तर कोरियात सुद्धा कोरोना व्हायरसचा संसर्ग झालेला पहिला रूग्ण सापडला आहे. असल्याची माहिती समोर येऊ लागली आहे.
याशिवाय या रूग्णाचे रिपोर्टही पॉझिटीव्ह आले आहेत. यावर उत्तर कोरियाचा हुकूमशहा किम जोंग उन याने यावर एक असा आदेश दिला आहे, जो प्रचंड थरकाप उडवणारा आहे. हा आदेश ऐकून अनेकांची झोप उडाली आहे.
याबाबत एका इंटरनॅशनल रिपोर्टनुसार, उत्तर कोरियात कोरोना व्हायरसचा पहिला रूग्ण सापडल्यानंतर हुकूमशहा किम जोंग उन याने देशात व्हायरस पसरण्यापासून रोखण्यासाठी हुकूमशहा किम जोंग उन याने देशात कोरोना व्हायरसचा पहिल्या रुग्णला गोळ्या घालून ठार मारण्याचा आदेश दिला आहे.