बिग बींचे ७७ व्या वर्षात पदार्पण

‘सदी का महानायक’, ‘बिग बी’, ‘शहेनशहा’, असा हा अभिनय सम्राट आजही आपलं मनोरंजन करतोय. त्यांच्या वयाचा आकडा आणि त्यांचा उत्साह आपल्या सारख्याला लाजवेल असाच आहे.

आज त्यांचा 77 वा वाढदिवस. जगभरातून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.ती ऊर्जा त्यांना मिळते कुठून? त्यानिमित्त जाणून घेऊ त्यांच्याविषयी माहित नसलेल्या गोष्टी…

1.ते दररोज सकाळी सर्वप्रथम जिमला जातात आणि काही कारणास्तव जर ते एका दिवसासाठी जिमची कसरत चुकले तर ते स्वत: वरच संतापतात.

2.ते निरोगी राहण्यासाठी संतुलित आहाराचा वापर करतात. त्याला उकडलेल्या भाज्या खाणे आवडते.

3. ते कोणत्याही प्रकारचे भारतीय मिठाई, केक, पेस्ट्री खात नाहीत ज्यात कॅलरी आणि साखर जास्त असते. दररोज एक चमचा मध खाणे पसंत करतात.

4.अमिताभ ‘मल्टी टॅलेंटेड’ आहेत. कारण ते हे उजव्या आणि डाव्या अशा दोन्ही हाताने लिहितात.

5. अमिताभ यांना आधी इंजिनीअर व्हायचे होते. त्यानंतर त्यांनी वायू दलात जाण्याचे ठरवले. मात्र ते चित्रपटसृष्टीत आले आणि ‘शहेनशहा’ झाले.

6. बिग बी यांना टीबी, यकृत सिरोसिस आणि हेपेटायटीस बी सारख्या गंभीर आजारांनी ग्रासले होते. सध्या बिग बी केवळ 25 टक्के यकृतावर जिवंत आहेत. तरीही ते अगदी तंदुरुस्त आणि निरोगी आहेत.

7.त्यांच्या आवाजाचं गारुड आज जगातील प्रत्येक व्यक्तीच्या मनावर आहे. “भुवन सोम”, “शतरंज के खिलाडी”, “लगान” चित्रपटात त्यांचा आवाज निवेदक स्वरुपात आपण ऐकला.

8. त्यांचा एक स्वप्न आहे. त्यांना पियानो वाजवायचा आहे. खुप साऱ्या भाषा शिकायच्या आहेत.

अशा या अभिनय सम्राटाला त्यांच्या भावी वाटचालीला मन:पूर्वक शुभेच्छा!

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा