आणखी दोन रुग्णांची पुष्टी, राज्यात एकूण ४७ रुग्ण

मुंबई: मुंबई आणि उल्हासनगरमध्ये करोनाचे आणखी दोन रुग्ण आढळले आहेत.  दुबईवरून परतलेल्या उल्हासनगरमधील ४९ वर्षीय महिलेला कोरोना विषाणूचा संसर्ग झाला आहे. राज्यात या विषाणूच्या बाधितांची संख्या गुरुवार सकाळपर्यंत ४७ वर पोहोचली  आहे. कोरोना विषाणूची तिची चाचणी सकारात्मक आली आहे. तर युकेवरुन परतलेल्या २२ वर्षीय मुंबईतील तरुणीलादेखील कोरोना विषाणूची लागण झाल्याचं समोर आलं आहे.

ही तरुणी ब्रिटनमधून आली होती. त्यामुळे तिच्यावरही विलगीकरण कक्षात उपचार सुरू आहेत. त्यामुळे राज्यातील करोना रुग्णांची संख्या ४७वर पोहोचली असून देशातील करोना रुग्णांची संख्या १७१वर पोहोचली आहे. गुरुवारी  सकाळी या दोघांच्या कोरोना चाचण्या पॉझिटीव्ह आल्या आहेत. देशात महाराष्ट्रात कोरोनाची लागण झालेल्यांची संख्या ही सर्वाधिक आहे.

सार्वजनिक ठिकाणी होणारी अनावश्यक गर्दी टाळण्यासाठी मुंबईत ५० टक्के दुकाने एक दिवसाआड बंद ठेवण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. गर्दीची ठिकाणे आणि गजबजलेल्या परिसरात या निर्णयाची अंमलबजावणी केली जाणार आहे. पहिल्या टप्प्यात दादर, माहीम, धारावी या भागातील केमिस्ट आणि अन्नधान्य जीवनावश्यक वस्तूंची दुकाने वगळता इतर सर्व दुकाने एक दिवसाआड बंद राहाणार आहेत.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा