मुंबई: कोरोनाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी मुंबई महापालिकेने केलेल्या आवाहनाला मुंबईतील व्यापाऱ्यांनी प्रतिसाद देण्यास सुरुवात केली आहे.
त्याचाच एक भाग म्हणून दादरमधील व्यापाऱ्यांनी गुढीपाडव्यापर्यंत ६०० दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याचप्रमाणे मुंबईकरांना डबे पुरविणाऱ्या डबेवाल्यांनीही येत्या ३१ मार्चपर्यंत डबे पुरविण्याची सेवा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.
बाजारातील गर्दी टाळावी आणि त्यामुळे कोरोनाचा होणारा संभाव्य फैलाव टाळावा यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. बाजारातील गर्दी टाळण्यासाठी व्यापाऱ्यांनी दुकाने बंद करण्याचं आवाहन मुंबई पालिकेने केले होते. त्याला दुकानदारांनी प्रतिसाद दिला आहे.
मात्र मुंबईतील करोना रुग्णांची संख्या वाढतच चालल्याने दादर व्यापारी संघाने गुढीपाडव्यापर्यंत म्हणजे २५ मार्चपर्यंत दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.