कोरोनामुळें मृत्यूची संख्या वाढली, महाराष्ट्रात ४ था बळी

पुणे: कोरोना विषाणूमुळे भारतात १५ जणांचा मृत्यू झाला आहे. जम्मू-काश्मीरच्या श्रीनगरमध्ये गुरुवारी सकाळी ६५ वर्षांच्या कोरोना विषाणूच्या पेशंटचा मृत्यू झाला. हा १४ वा मृत्यू होता. या नंतर आता महाराष्ट्रात १५ बळी कोरोनाने घेतला आहे. देशात sarvadhik कोरोना रुग्ण हे महाराष्ट्रात आहेत. तर सर्वात जास्त मृत्यू देखील महाराष्ट्रात झाले आहेत. महाराष्ट्रात आत्ता पर्यंत १२८ जणांना बाधा झाली असून त्याचे ४ बळे पडले आहेत. आतापर्यंत भारतात कोरोना विषाणूची ६३४ प्रकरणे नोंदली गेली आहेत.

जगभरात कोरोना व्हायरसचा प्रकोप सुरु आहे. जगभरात जवळपास पावणेपाच लाख लोक कोरोनाबाधित झाले आहेत. तर २१ हजार २०० लोकांचा आतापर्यंत कोरोनाने बळी घेतला आहे. पश्चिम बंगालमध्ये कोरोना विषाणूची आणखी एक घटना समोर आली आहे. येथे ६६ वर्षीय व्यक्तीमध्ये एक सकारात्मक लक्षण आढळले आहे. हे प्रकरण कोलकाताच्या नयाबाद भागाशी संबंधित आहे. बंगालमध्ये आतापर्यंत १० प्रकरणे नोंदली गेली आहेत. यासह, देशात कोरोना विषाणूच्या रुग्णांची संख्या वाढून ६३४ झाली आहे.

करोना व्हायरसचा कहर दिवसेंदिवस वाढतच चाललेला दिसतोय. रुग्णांच्या संख्येत सतत वाढ होत असल्याचं आकडेवारी दर्शवतेय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निर्देशानुसार, संपूर्ण देशात तीन आवड्यांसाठी लॉकडाऊन घोषित करण्यात आलाय. यामुळे, रुग्णांची संख्या कमी होण्याची शक्यता व्यक्त होतेय. परंतु, सद्य घडीला देशात आढळलेल्या करोनाबाधित रुग्णांची संख्या ६३४ वर पोहचलीय. यामध्ये, ४३ परदेशी रुग्णांचा समावेश आहे.

कोविड १९ : महाराष्ट्र हेल्पलाईन

महाराष्ट्रातील नागरिकांनी करोना व्हायरसशी संबंधित अधिकृत माहिती मिळवण्यासाठी पुढील टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा

राज्य नियंत्रण कक्ष : ०२० – २६१२७३९४
टोल फ्री नंबर : १०४
राष्ट्रीय कॉल सेंटर : +९१ ११ २३९७८०४६

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा