नगर : जलसंधारणमंत्री शंकरराव गडाख यांनी स्वतःची शासकीय सुरक्षा यंत्रणा संचारबंदीच्या बंदोबस्तासाठी दिली आहे. मंत्री गडाख यांनी याबाबत एक प्रसिद्धीपत्रकच जारी केले आहे.
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी संचारबंदीच्या पोलीस यंत्रणेवर ताण आहे. त्याची दखल घेत मंत्री गडाख यांनी हा निर्णय घेतला आहे. तसा तो त्यांनी जाहीर केला आहे.
कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर लागलेल्या संचारबंदीसाठी स्वतःच्या बंदोबस्तासाठी असलेली पोलीस यंत्रणा संचारबंदीच्या आदेशाच्या अंमलबजावणीसाठी देणारे राज्यात गडाख हे पहिले मंत्री ठरले आहेत.
मंत्री गडाख यांच्या या निर्णयाचे राज्यभरात कौतुक होत असून त्यांनी एक आदर्श घातला आहे.
याबाबत गडाख यांनी अहमदनगर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक यांना तसे त्यांनी पत्र लिहिले आहे, त्याची तत्काळ अंमलबजावणी करण्याची विनंतीही मंत्री गडाख यांनी केली आहे.