एमआयएम च्या आमदारांची वैद्यकीय अधिकाऱ्यांना धक्काबुक्की

मालेगाव: सध्या देशावर व राज्यात कोरोनाचे संकट ओढवले आहे. यावर उपाय म्हणून संचार बंदी केली गेली आहे. संचार बंदीच्या काळात मालेगावातील शासकीय रुग्णालयात एमआयएमचे आमदार मौलाना मुफ्ती ईस्माईल यांच्यासह त्यांच्या २० ते २५ कार्यकर्त्यांनी वैद्यकीय अधिकारी डॉ. किशोर डांगे यांच्याशी हुज्जत घालत त्यांना धक्काबुक्की केली. बुधवारी रात्री ही घटना घडली. आमदार मुफ्ती इस्माईल यांच्या उपस्थितीत त्यांच्या समर्थकांनी डॉक्टर आणि रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना शिवीगाळ आणि धक्काबुक्की केली होती. त्याचा व्हिडिओ समोर आला आहे. त्यामुळे  सामान्य रुग्णालयात घातलेला गोंधळ एमआयएमचे आमदार मुफ्ती इस्माईल यांना चांगलाच भोवला आहे.

धक्कादायक म्हणजे आमदारांचा फोन उचलला नाही म्हणून हा सारा धुडगूस घालण्यात आला. दरम्यान, सामान्य रुग्णालयात आमदार मुफ्ती इस्माईल यांच्या ओळखीतील दोन रुग्णांवर उपचार सुरू होते. त्यांना डिस्चार्ज देण्यासाठी डॉक्टर चालढकल करत होते, असा आमदारांचा आरोप आहे. याप्रकरणी आता पोलीस पुढील तपास करत आहेत. घटने समयी मौलाना तसेच त्यांच्यासोबतचे आलेले कार्यकर्ते थेट वैद्यकीय अधिकारी डॉ. किशोर डांगे यांच्या दालनात शिरले. तेथे त्यांनी आरडाओरड व मोठमोठ्या आवाजात शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. यामुळे रुग्णालयातील इतर महिला व पुरुष डॉक्टर्स, वॉर्डबॉय, नर्सेस भयभीत झाले.

करोनाचे संशयीत रुग्ण रुग्णालयात दाखल असताना तसेच संचारबंदीचा आदेश असताना आमदारांसह इतका मोठा जमाव रुग्णालयात घुसतोच कसा, असा सवाल यावेळी उपस्थित करण्यात आला. या प्रकारानंतर रात्री उशिरा वरीष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी परिस्थिती हाताळली. रात्री उशिरापर्यत पोलीस कारवाई सुरू होती.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा