आयुर्विम्यातील बोनस बद्दल सर्व माहिती

सर्वसाधारणपणे बोनस म्हणजे आश्वासित उत्पन्ना व्यतिरिक्त मिळणारी रक्कम. आयुर्विम्यात बोनसची संकल्पना समान असते. आश्वासित रक्कम (अपेक्षित उत्पन्न) मिळण्याचा विमाधारकाला अधिकार असतो, आणि त्याशिवाय बोनस रक्कम पण मिळू शकते. हे कसे होते, ते आपण समजून घेऊ.                                              सर्वसाधारणपणे बोनस म्हणजे आश्वासित उत्पन्ना व्यतिरिक्त मिळणारी रक्कम. आयुर्विम्यात बोनसची संकल्पना                 समान असते. आश्वासित रक्कम (अपेक्षित उत्पन्न) मिळण्याचा विमाधारकाला अधिकार असतो, आणि त्याशिवाय बोनस रक्कम पण मिळू शकते. हे कसे होते, ते आपण समजून घेऊ.                                                         जेव्हा आयुर्विमा कंपनी नफा (अतिरिक्त) कमविते, तेव्हा कंपनीला बोनस रकमेच्या रूपात आपल्या विमाधारकांना नफ्याचा काही भाग वाटावा लागतो. नफा झाल्यास कंपनी शेअरच्या बाबतीत डिविडेंड जाहीर करते तसे हे असते. विमा कंपनीच्या मालमत्तेचे आणि दायित्वांचे मूल्यांकन केल्यानंतर आयुर्विमा कंपनी कडे अतिरिक्त रक्कम निर्माण होऊ शकते. ही अतिरिक्त रक्कम प्रत्येक आर्थिक वर्षाच्या शेवटी बोनसच्या रूपात विमाधारकांमध्ये वाटली जाते. बोनस साठी कुठल्या विमा योजना पात्र असतात?                                                                                             प्रत्येक विमाधारकाला बोनस मिळत नाही. बोनस मिळणार की नाही हे कुठल्या प्रकारचा विमा आहे त्यावर अवलंबून असते.पारंपरिक विमा योजना, जसे स्थायीदान किंवा पैसे-परत योजना ह्या ‘सहभागात्मक’ (किंवा ‘नफ्या-सहित’) योजना असू शकतात, ज्यात बोनस मिळतो, किंवा ‘अ- सहभागात्मक’ (किंवा ‘नफा रहित’) योजना असू शकतात ज्या बोनस साठी पात्र नसतात. साहजिकपणे, ‘अ-सहभागात्मक’ योजनांचे हप्ते ‘सहभागात्मक’ योजनांपेक्षा कमी असतात.काही ‘नफ्या-सहित’ योजनांचे परतावे बोनसवर अवलंबून नसतात, त्या ऐवजी योजनेला एक ‘आश्वासित भर’ (जीए) असते. बोनस किती जाहीर होईल ह्याची कल्पना नसते, आणि ते विमा कंपनीच्या नफ्यावर अवलंबून असते. ह्या विपरीत जीए ही विम्यात आश्वासित भर असते. विमा विकत घेताना हे विमाधारकाला सांगण्यात येते. बोनस जाहीर करणे                                                                                                                              ‘नफ्या-सहित’ रकमेच्या प्रत्यक्ष अनुभवावरून विमा कंपनी मागच्या आर्थिक वर्षासाठी बोनस दर जाहीर करते, म्हणजे थकबाकी रूपात. अतिरिक्त रक्कम आणि बोनस किती आहे हे गुंतवणूक उत्पन्नावर अवलंबून असते, तसेच खर्च आणि मृत्यू दर ह्यांची पण भूमिका असते. बोनस रक्कम जाहीर करताना भविष्यातल्या व्याज दराचा अनुमान पण महत्वाची असते.                                                                                                  बोनस कसा ठरवला जातो                                                                                                                          बोनस प्रत्येक रु. १००० आश्वासित रकमेसाठी एका विशिष्ट रकमेच्या स्वरुपात किंवा आश्वासित रकमेच्या काही टक्क्याच्या स्वरुपात जाहीर होतो. उदाहरणार्थ प्रत्येक रु. १००० आश्वासित रकमेसाठी बोनस रु. ४० असू शकतो. मग रु १ लाख आश्वासित रक्कम असलेल्या विम्यासाठी बोनस रक्कम रु. ४००० असेल. वरच्या उदाहरणात, जर विम्याची मुदत दहा वर्षे असेल, तर मुदतपूर्ती नंतर एकूण बोनस रक्कम रु ४०,००० असेल. काही विमा कंपन्या विम्याच्या मुदतीतच विमाधारकांना बोनस काढू देतात. जर मुदती दरम्यान विमाधारकाचा मृत्यू झाला तर नामनिर्देशिताला आश्वासित रक्कम आणि तोपर्यंत गोळा झालेले बोनस मिळते.                                              बोनसचे प्रकार                                                                                                                                   सरल प्रत्यावर्ती बोनस: बहुतांश पारंपारिक आयुर्विमा योजनांमध्ये बोनस रक्कम योजनेत जोडली जाते आणि विम्याची मुदत संपेपर्यन्त रक्कम गोळा होत राहते. हे सरल प्रत्यावर्ती बोनस असते. वरच्या उदाहरणात रु. ४०,००० हे सरल प्रत्यावर्ती बोनस आहे.                                                                                          संयुक्त प्रत्यावर्ती बोनस:                                                                                                                       दुसर्‍या वर्षी पासून, जर आश्वासित रक्कम अधिक मागच्या वर्षीच्या बोनस वर बोनस जाहीर झाला तर तो संयुक्त प्रत्यावर्ती बोनस असतो. दोन्ही परिस्थितीत, योजनेची मुदत संपल्यावर किंवा मृत्यू झाला तरच संपूर्ण बोनस मिळतो कारण तो ‘प्रत्यावर्ती’ स्वरूपाचा असतो.                                                                                मध्यवर्ती बोनस: आर्थिक वर्षाच्या शेवटी बोनस जाहीर होतात. पण ह्या अवधीत विम्याची मुदत संपली किंवा मृत्यू झाला तर? अशा परिस्थितींची काळजी घेण्यासाठी, आणि विमाधारकांची गैरसोय होऊ नये म्हणून, विमा कंपन्या मध्यवर्ती बोनस जाहीर करतात. त्या विशिष्ट वर्षा साठी बोनसची रक्कम प्रो-रेटा आधारावर मोजली जाते आणि विम्याला जोडली जाते.                                                                                                            शेवटचा बोनस: नावाप्रमाणे, शेवटचा बोनस विम्याची मुदत संपल्यानंतर किंवा मृत्यू झाल्यास जोडला जातो. हा बोनस एकदाच देण्यात येतो, आणि विमा कंपनी अशा विमाधारकांसाठी हा बोनस जाहीर करते ज्यांचा विमा मूळ मुदतीपर्यन्त चालू आहे. म्हणून हा बोनस अशा विम्यांना जोडला जात नाही ज्यांचे हप्ते भरले गेले नाही आहे किंवा ज्या विमा योजना परत केल्या गेल्या आहेत.                                                                                                        बोनसची वैशिष्ट्ये· ‘नफ्या-सहित’ विम्यात विमा कंपनी बोनस जाहीर करू शकते अथवा नाही करत कारण हे विमा कंपनीच्या (किंवा फंडच्या) नफा क्षमतेवर अवलंबून असते. · म्हणून प्रत्येक वर्षी विमा कंपनीचा किती नफा होतो त्यावर आधारित बोनसची रक्कम वेगळी असू शकते. · बोनस जाहीर करायच्या तारखेला विमा अंमलात असेल (म्हणजे सर्व हप्ते भरले असतील तर) तर विम्याचा मुदतीमध्ये प्रत्येक वर्षासाठी वार्षिक बोनस जाहीर होतो. · एकदा विमा कंपनीने बोनस जाहीर करून तो दिला, की तो विम्याचा एक भाग बनतो आणि मुदतपूर्तीला किंवा विमा वेळापत्रकात नमूद विशिष्ट वेळी विमा कंपनी ते देण्याची हमी देते. · विम्याला किती बोनस जोडला जाईल हे विम्याच्या अवधीवर अवलंबून असते. साधारणपणे संपूर्ण आयुर्विमा योजनांना अधिक बोनस रक्कम मिळते. · जर विम्याचे हप्ते भरणे बंद झाले असतील तर तो पर्यन्त जाहीर झालेला बोनस विम्याला जोडला जातो, मात्र, त्यापुढे बोनस मिळत नाही. · विम्याच्या लाभांना जोडलेले बोनस विमा रद्द केल्याशिवाय काढता येत नाहीत. · मृत्यू दावा, मुदतपूर्ती दावा किंवा विमा परत केला तरच बोनस देय असतो. तुमच्या योजनेत बोनस कुठे मिळतो विमा किती अवधीसाठी हवा आहे हे आधी ठरवा. उदाहरणार्थ, तुम्हाला १५ ते २० वर्षे बचत करायची आहे. त्याच अवधीसाठी विमा कंपनीने मागच्या वर्षी किती बोनस जाहीर केला होता ते एजेंटला दाखवायला सांगा. सद्य परिस्थितीतल्या व्याज दरानुसार २० वर्षाचे बोनस हे फक्त आश्वासित रकमे एवढे असेल. ह्यामुळे विमाधारकाला मुदतपूर्तीला मिळणार्‍या रकमेबद्दल (आश्वासित रक्कम अधिक बोनस) कल्पना येईल आणि ही रक्कम विमाधारकाच्या दीर्घावधी लक्षपूर्ती साठी पुरेशी आहे की नाही हे पण लक्षात येईल.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा