नगरसेवकांचे वेतन मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी उपमुख्यमंत्र्यांकडे सुपूर्त

पिंपरी चिंचवड : कोरोनाच्या संकटावर मात करण्यासाठी राज्य सरकारकडून सर्वच स्तरातून प्रयत्न सुरू आहेत. त्याच पार्श्वभूमीवर राज्य सरकारला मदतीचा हात पिंपरी चिंचवड महापालिकेतील राष्ट्रवादी, शिवसेना आणि मनसेच्या नगरसेवकांनी दिला आहे. सर्व नरसेवकांचे गेल्या महिन्याचे संपूर्ण मानधन मुख्यमंत्री सहाय्यता निधी देण्यात आले.
या निधीचा धनादेश उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्याकडे सुपर्त करण्यात आला.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे पाटील आणि विरोधी पक्षनेते विठ्ठल उर्फ नाना काटे उपस्थित होते.

पिंपरी चिंचवड महापालिकेत राष्ट्रवादी काँग्रेसचे ३८ नगरसेवक आहेत.तर शिवसेनेचे ९ आणि मनसेचे एक असे एकूण ४८ नगरसेवकांनी आपले एक महिन्याचे मानधन मुख्यमंत्री सहाय्यता निधीला दिले आहे. यासंदर्भात बोलताना विरोधी पक्षनेते नाना काटे म्हणाले की, कोरोनाच्या विरोधातील लढ्यात राज्य सरकार योग्य त्या उपाययोजना घेत आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पिंपरी चिंचवड शहरावर बारकाईने लक्ष आहे. शहरातील रुग्ण तसेच परिस्थिती संदर्भात दररोज त्यांच्याकडून विचारपूस केली जात आहे. शहरातील राष्ट्रवादी, शिवसेना तसेच मनसेच्या नगरसेवकांकडून प्रशासनाला योग्य ते सहकार्य केले जात आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जे काही निर्णय प्रशासन घेत आहे, त्याला सर्व नगरसेवक प्रतिसाद देत आहेत.

त्याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि मनसेच्या नगरसेवकांनी एक महिन्याचे मानधन मुख्यमंत्री सहाय्यता निधीला देण्याचे ठरवले होते. त्यानुसार एकत्रित असा धनादेश उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे सुपूर्त करण्यात आला.

 

                                                                                       प्रतिनिधी- प्रगती कराड

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा