भिगवण : सध्या देशात आजून कोरोना विषाणूचे प्रमाण वाढत आहे. त्याला रोखण्यासाठी केंद्र सरकार आणि राज्य सरकार प्रयत्न करत आहे. यामुळे आता भिगवण पोलीस प्रशासनाने नागरिकांच्या आणि स्वतःच्या सुरक्षेसाठी निर्जंतुकीकरण रूम तयार केली आहे.
पोलिसांना सतत समाजात फिरावे लागत असल्यामुळे आणि नागरिकही सतत काही ना काही कामामुळे पोलीस स्टेशनमध्ये येत असल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे.
कोरोना विषाणू हा कोणाच्या माध्यमातून किंवा आपल्या माध्यमातून होऊ नये म्हणून आधीच ही उपाययोजना करण्यात आली आहे. जर पोलीस काही कामासाठी बाहेर पडणार असतील तर त्यांनीही निर्जंतुकीकरण होऊन बाहेर पडायचे आहे. जर एखादा नागरिक कामासाठी पोलीस स्टेशनमध्ये आला तर त्यांनी ही त्या खोलीत उभे राहून निर्जंतुकीकरण झाल्यावरच आत प्रवेश करायचा आहे.
सध्या इंदापूर तालुक्यात अद्याप तरी कोरोनाचा शिरकाव झालेला नाही. यामुळे तालुका प्रशासनाने आणि स्थानिक प्रशासनाने नागरिकांची काळजी घेण्यासाठी योग्य त्या उपाययोजना केल्या आहेत. तसेच तालुक्यातील भिगवण, तक्रारवाडी, डिकसळ, कुंभारगाव, मदनवाडी, कळस, पोधवडी, पळसदेव, डाळज नं १,२,३, शेटफळ, पिपळे या गावाने योग्य ती दखल घेतली आहे, तसेच गावात येणारे सर्व रस्ते बंद केले आहेत.
दरम्यान, कोरोनाला रोखण्यासाठी प्रशासनाकडून नागरिकांची योग्य काळजी घेतली जात आहे. नागरिकही आता स्वतःची काळजी घेऊ लागले आहेत. तसेच अजून तरी कोरोनाचे प्रमाण आटोक्यात नसल्यामुळे नागरिकांनी दिलेल्या सुचनाने पालन करावे, असे भिगवण पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक जीवन माने यांनी सांगितले आहे.
प्रतिनिधी- अमोल यादव