बारामती : पित्यानेच पोटच्या मुलीचे सात वर्षे लैंगिक शोषण केल्याचा धक्कादायक प्रकार शहरातील प्रगतीनगर भागात उघडकीस आला आहे.
याप्रकरणी पिडीतेने दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी नराधम बापाविरोधात बलात्कार तसेच बाललैंगिक अत्याचार कायदा कलमानुसार गुन्हा दाखल केला आहे. याबाबत २० वर्षीय पिडीतेने शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली.
याबाबत अधिक माहिती अशी की, पीडित मुलगी १३ वर्षाची असल्यापासून पित्याकडून तिच्यावर अत्याचार केला जात होता. फिर्यादीत नमूद केल्यानुसार १३ डिसेंबर २०१३ ते १९ मार्च २०२० या कालावधीत प्रगतीनगर येथे राहत्या घरात ही घटना घडली. २०१३ मध्ये या मुलीला मासिक पाळी सुरु झाली. त्यामुळे तिला त्रास होवू लागला. याचा फायदा घेत तिच्या बापाने तिच्याजवळ जात तुला मासिक पाळीमुळे पोटदुखीचा त्रास होत आहे. त्याच्यावर माझ्याकडे एक उपाय आहे असे म्हणत जबरदस्तीने तिच्यावर बलात्कार केला. ती वयाने लहान असल्याने आणि बापाला घाबरत असल्याने तिने यासंबंधाची कुठेही वाच्यता केली नाही. त्याचाच गैरफायदा घेत नराधम बापाने सलग सात वर्षे वेळोवेळी तिच्या इच्छेविरुद्ध तिच्याशी शारिरिक संबंध प्रस्थापित केले. त्याने या प्रकाराबाबत कोणाला काही सांगितले तर तुझ्याकडे बघून घेईन अशी धमकी तिला दिली होती. परंतु बापाचा त्रास असह्य होवू लागल्याने तिने आईला व अन्य नातेवाईकांना या प्रकाराबाबत कल्पना देत पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली. नराधम बापाविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
प्रतिनिधी- अमोल यादव