पुणे : लॉक डाऊनमुळे सध्या सर्वच उद्योग धंदे थांबले आहेत. त्यामुळे हातावर पोट असणाऱ्या नागरिकांचे चांगलेच हाल होत आहेत. यामुळे पुणे जिल्ह्यातील वीटभट्टी व्यावसायिक चांगलाच संकटात सापडल्याचे चित्र दिसत आहे.
वाहतूक सेवा बंद असल्याने कच्च्या मालाचाही तुटवडा जाणवत असून त्यामुळे कामगारांच्या हाताला काम नाही. मग त्या कामगारांना वेतन द्यायचे कुठून…? असा प्रश्न सध्या वीट भट्टी व्यावसाययिकांना समोर उभा आहे. पुणे जिल्ह्यात वीटभट्टी व्यावसायिक मोठ्या प्रमाणावर आहे. त्यात या बंदमुळे ते चांगलेच आर्थिक संकटात सापडला आहे. तरी सरकारने या वीटभट्टी व्यावसायिकांना आर्थिक मदत करावी अशी मागणी व्यावसायिकांकडून होऊ लागली आहे.
“न्यूज अनकट” प्रतिनिधी- प्रशांत श्रीमंदिलकर