इंडिगोच्या कनिष्ठ कर्मचाऱ्यांना वेतन कपातीबाबत दिलासा.

नवी दिल्ली: कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव झाल्यामुळे देशात ३ मे पर्यंत लॉक डाउन आहे. लॉकडाऊनमुळे सर्व विमान सेवा बंद आहेत. अशा परिस्थितीत विमान कंपन्यांचे मोठे नुकसान होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. याचा परिणाम विमान कंपन्यांच्या कर्मचार्‍यांवरही होऊ लागला आहे. देशातील आघाडीची विमान कंपनी इंडिगो यांनी कर्मचार्‍यांना किरकोळ दिलासा दिला आहे.

वास्तविक इंडिगोने आपल्या वरिष्ठ कर्मचार्‍यांचे वेतन कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. इंडिगोचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोनोजोय दत्ता यांच्या म्हणण्यानुसार , कंपनी एप्रिल महिन्यातील पगार कपात करेल. तथापि ही कपात केवळ वरिष्ठ कर्मचार्‍यांच्या पगारीतून होईल, असेही कंपनीने म्हटले आहे. यापूर्वी इंडिगोचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोनोजोय दत्ता यांनी सांगितले होते की १ एप्रिल २०२० पासून बॅन्ड-ए आणि बॅन्ड-बी वगळता इतर सर्व कर्मचार्‍यांचे पगार कापले जातील. बँड-ए आणि बँड-बी मध्ये सर्वात कमी पगार असलेले कर्मचारी आहेत.

रोनोजोय दत्ता म्हणाले होते की ते स्वत: त्यांच्या पगारात २५ टक्के कपात करतील. त्याच वेळी, वरिष्ठ उपाध्यक्ष त्यांचे पगार २० टक्क्यांनी कमी करतील, तर कॉकपिट कर्मचाऱ्यांच्या पगारामध्ये १५ टक्क्यांनी कपात केली जाईल. तथापि पंतप्रधान नरेंद्र मोदी हे वारंवार वेतन कपात न करण्याची विनवणी करत असताना हि इंडिगोने हा निर्णय घेतला आहे. यापूर्वी पंतप्रधान मोदींनी प्रत्येक क्षेत्रातील कंपन्यांना पगार वाढवू नये किंवा पगार कमी करू नये असे आवाहन केले होते. तथापि, असे असूनही वेगवेगळ्या क्षेत्रांतून पगार कपात केल्याचे वृत्त समोर आहे.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा