मंचर,दि. २५ एप्रिल २०२० : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर झोमॅटो फिडिंग इंडिया प्रा.लि.व पुणे जिल्हा परिषद समाज कल्याण विभाग ,पुणे यांच्या मार्फत पुणे जिल्ह्यातील ६०% पेक्षा जास्त अपंगत्व असलेल्या ५१६० दिव्यांग व्यक्तिंना रेशन धान्याचा पुरवठा करण्यात आला.
यामध्ये आंबेगाव तालुक्यातील ६०८ दिव्यांग व्यक्तिंना रेशन किट पॅकिंग करून देण्यात आले. पाच किलो तांदूळ,पाच किलो गहू ,पीठ, हरभरा डाळ,दोन किलो कांदे,याचा समावेश आहे.मंचर महिला अस्मिता भवन या ठिकाणी हे सर्व साहित्य एकत्र करून तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतीच्या माध्यमातून त्याचा पुरवठा दिव्यांगाना करण्यात आला आहे.
झोम्याटो हेड बी.व्ही.चंदन यांच्या सहकार्याने व उद्योजक लक्ष्मीकांत खाबीया यांच्या माध्यमातून हा उपक्रम राबविण्यात आला.
याठिकाणी जि.प.मा .उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील ,जि.प.सदस्या अरुणा थोरात ,उपसभापती संतोष भोर तसेच आंबेगाव तालुका बी.डी.ओ. जालिंदर पठारे यांनी या मालाची पाहणी करून सर्व माल तालुक्यातील दिव्यांग बांधवापर्यत योग्य पुरवठा करण्याच्या सूचना दिल्या.
न्यूज अनकट प्रतिनिधी: साईदिप ढोबळे