व्हॉट्सॲप वर लॉन्च झाले जिओ मार्ट

मुंबई : २७ एप्रिल २०२० : अलीकडेच फेसबुकने रिलायन्समध्ये मोठ्या गुंतवणूकीची घोषणा केली आहे. फेसबुक आणि रिलायन्स यांच्यातील या कराराअंतर्गत व्हॉट्सॲप आणि रिलायन्स जिओ यांच्यातही एक व्यावसायिक करार झाला आहे. हे जियोमार्ट या ऑनलाइन उपक्रमासाठी आहे. अहवालानुसार, जियोमार्ट आता ट्रायल च्या आधारे लाँच करण्यात येत आहे. रिलायन्स रिटेलचा हा ई-कॉमर्स उपक्रम असेल आणि सुरुवातीला तो मुंबईत सुरू होत आहे.
कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे सध्या देशभरात लॉकडाउन सुरू आहे, अशा परिस्थितीत रिलायन्सच्या जिओ मार्टचा फायदा होईल. एवढेच नाही तर जिओमार्ट हा व्हॉट्सॲपवर आधारित ऑनलाइन पोर्टल आहे, त्यामुळे रिलायन्सला व्हॉट्सॲपच्या युजर बेसचा फायदादेखील मिळत आहे. व्हॉट्सॲपचे भारतात ४०० दशलक्ष वापरकर्ते आहेत. लॉकडाऊन दरम्यानच हा करार पूर्ण होऊन काम सुरू होईल.
असे म्हटले जात आहे की रिलायन्स इतर राज्यांतही आपली पायलट रन सुरुवात करू शकते आणि जिओ मार्ट पुढे करण्यात व्हॉट्सॲप महत्त्वपूर्ण भूमिका बजावू शकते. जिओ मार्ट वापरण्यासाठी ग्राहकांना प्रथम त्यांच्या मोबाईलवर ८८५०००८००० नंबर सेव्ह करावा लागेल. जिओ मार्ट मधील ग्राहकांना एक लिंक देण्यात येईल जिथून ऑर्डर दिली जाऊ शकते.
रिलायन्स त्यास देशातील एक नवीन स्टोअर म्हणत असून याअंतर्गत कंपनीने कोट्यावधी किराणा दुकानांना आपल्या व्यासपीठावर आणल्याचे सांगितले जात आहे. सध्या नवी मुंबई, ठाणे आणि कल्याण यासारख्या मुंबईतील निवडक भागात ही सेवा सुरू केली जात आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा