जायभाय कुटुंबीयांकडून अन्नदानासाठी १ लाख रुपयांची मदत

राजगुरूनगर, २९ एप्रिल २०२० : कोरोना विषाणू चा प्रादुर्भाव वाढत असताना लोकडॉऊनमुळे अनेक हातावर पोट असणाऱ्या कुटुंबांना पोटाची खळगी भरावी, कोणताही गरीब गरजू नागरीक उपाशी राहू नये यासाठी राजगुरूनगर येथील जायभाय कुटुंबातील दोन भावांनी पुढे येत गरजूंच्या अन्नदानासाठी हुतात्मा राजगुरू सोशल फौंडेशनला १ लाख रुपयांची मदत केली. या मदतीमुळे आपल्या गावासाठी काहीतरी चांगले करण्याची प्रेरणा दिल्याबद्दल राहुल व मयूर यांचे कौतुक होत आहे.
कौटुंबिक हलाखीच्या परिस्थितीमुळे राहुल व मयूर जायभाय या दोघा भावांनी आपल्या पालकांनी दिलेला श्रम संस्कार जपला. स्वकर्तृत्वावर प्रगतीची शिखरे ही भावंडे सर करीत आहेत. जे बी सी ट्रेडेक्स व बिल्टझ आयएएस अकादमीचे संचालक

असणाऱ्या राहुल दिलीप जायभाय यांनी आज एक लाखाची मदत हुतात्मा राजगुरू सोशल फौंडेशनला केली. या रकमेतून गरजूंना अन्नदान केले जाणार आहे. त्यांचे बंधू बिल्टझ आय एएस अकादमीचे अतिरिक्त संचालक व एमबीए महाविद्यालयात प्रोफेसर आहेत. त्यांनीही यात योगदान दिले आहे.

कोरोना संकटात मुख्यमंत्री सहायत्ता निधीसही राहुल व मयूर या बंधूनी हातभार लावला आहे. तसेच पिपंळे सौदागरला शिधाकिट वाटपही त्यांनी केले आहे. या दोघांचे वडील दिलीप जायभाय हे निवृत्त चालक व आई गृहिणी आहे. परिस्थितीला मात देत परिस्थिती अनुकूल बनविणाऱ्या जायभाय बंधूंचे दातृत्वात नेहमी योगदान राहिले आहे. विविध संस्था व गरजू यांना त्यांनी वेळोवेळी मदत केली आहे. कर्तृत्व आणि दातृत्व दाखविणाऱ्या राहुल व मयूर या दोन्ही भावांचे राजगुरूनगर व पिंपरी चिंचवड येथे कौतुक होत आहे.

अशा कठीण परिस्थितीत खरी गरज असताना अनेकांनी पुढे येऊन मदत करण्याचे आवाहन राहुल आणि मयूर यांनी केले आहे. यामुळे आपण या कोरोना च्या लढाईत यशस्वी होऊ शकतो.

न्यूज अनकट प्रतिनिधी: सुनिल थिगळे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा