सुहास गवतेंच्या आठवणीतले ऋषी कपूर

बाॅलिवूड चित्रपट सृष्टीला गेल्या दोन दिवसात दोन मोठे धक्के सहन करावे लागले आहेत. इरफान खानच्या निधनाला २४ तास पुर्ण होत नाही की सकाळी ऋषी कपूर यांच्या निधनांने बाॅलिवूडवर शोककळा पसरली.

सुहास गवते गेली ३२ वर्ष हिंदी व मराठी चित्रपट सृष्टीमधे रंगभूषाकार म्हणून कार्य करत आहेत.११८ चित्रपट २५००० पेक्षा जास्त मालिकांमध्ये त्यांनी काम केले आहे.नुकतीच मराठी प्रेक्षकांचा मनावर अधिराज्य गाजवणारी स्वराज्यरक्षक संभाजी या मालिकेचे देखील ते भाग होते.

रंगभूषाकार सुहास गवते यांच्याशी न्युज अनकट च्या प्रतिनिधीनीं संवाद साधला असता अनेक आठवणीं त्यांंनी ‘न्यूज आनकट’शी बोलताना ताज्या केल्या. ते सांगतात सनम रे चित्रपटासाठी आधी त्यांची सहाय्यक रंगभूषाकार म्हणून निवड झाली होती, पण सुदैवाने मुख्य रंगभूषाकाराचे काम त्यांना विचारण्यात आले असता त्यांनी आधी त्याचें ट्रायल दिले आणि ऋषी कपूर यांना त्यांचे काम आवडले व ती जवाबदारी त्यांच्यावर सोपवण्यात आली.

पुढे सुहास सांगतात, चित्रपटाच्या सेटवर ऋषी कपूर नेहमीच उत्साहाने, आनंदाने काम करायचे ते प्रेमळ जरी आसले तरी त्यांचा एक दरारा नेहमी सेटवर आसायचा आणि कामाच्या बाबतीत देखील चोख आसायचे. विशेष करुन तांत्रिक बाबतीत तर लक्ष ते आवर्जून घालायचे व गमंतीनेच म्हणायचे “माझा जन्म पाळण्यात झाला असला तरी मी कॅमेऱ्या समोरच जन्मलोय” असे सुहास गवते सांगतात. त्याच बरोबर सचिनचा विमानातील एक किस्सा सांगतात, ते म्हणाले ऋषी कपूर बरोबर पुण्याला विमानाने प्रावास करत होते तेव्हा ऋषी यांनी ज्या आत्मियतेने त्यांची विचारपूस करत होते, त्याबद्ल सांगताना ते भारावून गेले. काही कलाकारांना नेहमी गराडा हवा असतो, पण ऋषी कपूर त्यातील नव्हते ते नेहमीच सर्वांशी फार प्रेमळपणे राहयचे मग तो सेटवरील कोणीही व्यक्ती आसो.

सुहास सांगतात की, ऋषी कपूर यांची उणीव भरून निघेल पण ते ज्या आत्मियतेने किंवा प्रेमळपणाने प्रत्येकाला सांभळून घेत होते तसे आजचे कलाकार असतील का याबाबत त्यांनी थोडी साशंकता व्यक्त केली आहे. त्याबरोबरच चित्रपट सृष्टीचे फार मोठे नुकसान झाले आणि त्यांना हि बातमी कळताच त्यांनी दुःख व्यक्त केले.

अशा बहूआयमी, हरहुन्नरी, जिंदादिल व्यक्तीमत्वाला ‘न्यूज अनकट’ च्या माध्यमातून भावपूर्ण आदरांजली
आलविदा ऋषी…

एक प्रतिक्रिया

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा