पुणे, दि.३०एप्रिल २०२०: केप जेमिनी लिमिटेड या फ्रान्सस्थित कंपनीच्या वतीने १हजार ४०० पीपीई किट आणि ५०० लिटर सॅनिटायझर मदत स्वरुपात पुण्यातील जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले.
या कंपनीची पुण्यात हिंजवडी, तळवडे आणि मगरपट्टा येथे कार्यालये आहेत. कंपनीच्या वतीने आणखी आयआर थर्मामीटर आणि १००० फेस शिल्ड तसेच व्हेंटिलेटरची मदत देखील जिल्हा प्रशासनाकडे देण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
यावेळी अप्पर जिल्हाधिकारी साहेबराव गायकवाड, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. जयश्री कटारे, प्रांताधिकारी संतोषकुमार देशमुख तसेच कंपनीचे अधिकारी उपस्थित होते.
न्युज अनकट प्रतिनिधी: