पुणे, १ मे २०२०: लॉक डाउन मुळे अनेक नागरिक वेगवेगळ्या ठिकाणी अडकून पडले आहेत. त्यांच्यासाठी सरकारने दिलासादायक बातमी दिली आहे. यामुळे त्यांना आता आपल्या घरी परतता येणार आहे. यासाठी सरकारने काही अटी घातल्या आहेत तसेच त्यांची पूर्तता कशी करावी याबाबत देखील माहिती पुरविली आहे. त्याबाबत तपशील पुढे दिला आहे.
महाराष्ट्रामधील प्रवासी /राज्यांतर्गत प्रवास
नागरिकांसाठी:
• पुणे शहर तहसिल कार्यालयाच्या कार्यक्षेत्रामधील
१. एरंडवणा
२. येरवडा
३. औंध
४. बोपोडी (खडकी)
५. पर्वती ( सहकारनगर, मुकंदनगर
६. दर्शन, दत्तवाडी.)
७. घोरपडी पेठ, कोरेगाव पार्क
८. मुंढवा, केशव नगर
९. शिवाजीनगर, गोखले नगर, वडारवाडी
१०. बिबवेवाडी (मार्केट यार्ड गुलटेकडी) पुणे शहर व सर्व पेठा
सदर भागातील नागरिकांना त्यांच्या मुळ गावी जायचे आहे. त्यांनी त्यांची माहिती
tahasildarpunecity@gmail.com या Email Id वर पाठवावी.
माहितीचे स्वरूप:
१. संपुर्ण नाव –
२. सध्याचा पत्ता –
३. मोबाईल नंबर –
४. व्यवसाय – विद्यार्थी/ कामगार/नोकरी/ अन्य – त्याचा पत्ता
५. मूळ गावचा पत्ता – गाव, तालुका, जिल्हा, राज्य
६. प्रवास कसा करणार आहात – स्वत:चे वाहन/ सार्वजनिक वाहन
७. किती लोक प्रवास करणार –
• तसेच हवेली कार्यालयाच्या कार्यक्षेत्रामधील
बाणेर, कोंढवा, धनकवाडी, बालाजी नगर, सिंहगड रोड, धायरी, विश्रांतवाडी, चंदननगर,
हडपसर, मांजरी, कोथरूड, बालेवाडी, इत्यादी भागातील नागरिकांनी त्यांची माहिती
tahasildarhavelipune@gmail.com या Email Id वर पाठवावी.
• तसेच मुळशी कार्यालयाच्या कार्यक्षेत्रामधील पाषाण, सुस, वाकड, हिजवडी, बावधन, इत्यादी भागातील नागरिकांनी त्यांची माहिती
tahasildarmulshi@gmail.com या Email Id वर पाठवावी.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे
Gavi jych ahe
Amchykade sadhya paise nahit
मि भाकसखेडा ता उदगीर जिल्हा लातुर या गावचा रहिवासी आहे तरी हि सध्या पुणे भोसरी मध्ये राहतो
मी धिरज चौधरी, ITI आपेंडीस करतोय 512 आर्मी बेस ओर्कशॉप खडकी पुणे,मला माज्या गावाला जायाच,मी सध्या मी पिंपळे गुरव या एरियात राहातो.माझा गावाच पत्ता मु.माळपाडा पोस्ट.देगाव तालुका.साक्री जिल्हा.धुळे,424306
Me pranali mule Sdya aami ithe rahto Pune Ranjangaon juna tole naka taluka shirul jila pune pin 412209 ite rahto aamala aamca gavi jayc aahe maza gavac nav Anjangaovn bari taluka jila Amravati pin 444701
मी प्रतीक्षा भांबुरकर पुणे रांजणगाव जुना टोल नाका इथे राहते जिल्हा पुणे,तालुका शिरुल(412209) इथे राहतो मला घरी जायचं आहे माझ्या गावाचा पता ,आसरा नगर अंजनगाव बारी ,जिल्हा अमरावती ,तालुका अमरावती(444701)
मी योगेश पेड़ व माझ पुणॅ परीवार आमी 3जण राहतो पुणे वाकड संतोष नगर 1 मधी राहतो जिल्हा पुणे .तालुका मुळशी थेरगाव पुणे( 33) इथे राहतो मला घरी जायच आहे माझ्या गावाचा पता,तीथॅ आहे जिल्हा लातूर, तालुका अहमदपुर (413515)