पुणे, दि.४ मे २०२०: आपल्या राज्यात सध्या कोरोना महामारीने थैमान घातले आहे. त्यात पुणे आणि पिंपरी चिंचवड सारख्या शहरात कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढतांना दिसत आहेत. सर्वत्र संचार बंदी करण्यात आली आहे. मात्र, तरी देखील आपली जनता याबाबत अजून जागृत झालेली आपल्याला पहायला मिळत नाही. तरीही लोक बाहेर फिरताना , तोंडाला मास्क न लावता फिरताना दिसत आहेत. मात्र या सर्वांना एक आदर्श म्हणून सध्या सोशल मिडियावर एका चिमुरडीचा लोकांना उपदेश करतानाचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.
पिंपरी चिंचवड परिसरात राहणारी ही चिमुरडी आपल्या पाठीला अडकवलेल्या बॅगेतून सैनिटायझर काढून नागरिकांच्या हातावर देताना दिसत आहे. तसेच ते झाल्यावर मास्क काढून ते घालण्याचे आवाहन करताना पहायला मिळत आहे. आजाराचे गांभीर्य लक्षात घेऊन जे लोक मास्क वापरत नाहीत. त्यांच्यासाठी हा व्हिडीओ खरच पाहण्यासारखा आहे.
लहान मुलांना कोरोनाचे गांभीर्य लक्षात आले आहे. मात्र ते आपल्यासारख्या मोठ्या माणसांच्या कधी लक्षात येणार माहीत नाही. मात्र जेव्हा स्वतःवर वेळ आल्यावर वरिल गोष्टींचे पालन करण्यात काही अर्थ नाही. तेव्हा वेळ निघून गेलेली असते. त्यामुळे आपली काळजी घ्या.. घरात थांबा, आवश्यकता असेल तरच बाहेर पडा, असा संदेश या व्हिडिओ मधून देण्यात आला आहे.
न्युज अनकट प्रतिनिधी: