पुणे शहरात अवकाळी पावसाने कोसळली दीडशे झाडे

पुणे, दि.४ मे २०२० : मागील दोन दिवसांत झालेल्या वादळ आणि अवकाळी पावसामुळे पुणे शहरात दिडशेच्यावर झाडे उन्मळून पडली आहेत. तर काही उभ्या असलेल्या वाहनांवर पडून त्या वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे. पोलीस स्टेशन, शिवजीनागर, पेठा, शहराच्या मध्यवर्ती भागांत ही झाडे पडल्याचा घटना समोर आल्या आहेत. याबाबत अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी माहिती दिली आहे.

सध्या राज्यात लॉकडाऊन असल्याने सुदैवाने वाहतूककोंडी आणि जीवित हानी झाली नाही. पावसात झाडे पडल्याच्या आणि त्यामुळे वाहनांचे नुकसान झाल्याच्या अग्निशमन विभागाला जवळपास १५०च्या आसपास तक्रारी आल्या आहेत.
पुणे शहरात सध्या कोरोनाचा हाहाकार सुरू असताना अवकाळी पाऊस अधून मधून हजेरी लावून नुकसान करत आहे.
सकाळपासून दुपारपर्यंत कडक ऊन जाणवते. त्यानंतर सायंकाळच्या सुमारास गारवा निर्माण होत आहे. असे विचित्र हवामान सध्या पुण्यात तयार झाले आहे. हवामान खात्याकडून काही दिवस असाच अवकाळी पाऊस होणार असल्याचे शक्यता वर्तवण्यात येत आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी: प्रशांत श्रीमंदिलकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा