लॉकडाउन शिथिलतेमुळे पुण्यात ठीकठिकाणी गर्दी

पुणे, दि. ५ मे २०२० : केंद्र सरकारने तिसरे लॉकडाऊन घोषित करताना त्यामध्ये काही शिथिलता देण्यात आली. ४ मे ते १७ मे पर्यंत तिसऱ्या लॉक डाउनचा काळ सुरू झाला आहे. याला अनुसरून पुण्यामध्ये सुद्धा प्रतिबंधित भाग वगळता इतर भागांमध्ये काही नियमांमध्ये शिथिलता देण्यात आली. पोलीस प्रशासन आणि महानगरपालिका प्रशासन यांच्या आदेशानुसार हे नियम लागू झाले मात्र पुणेकरांनी जणू लॉक डाउन संपल्या सारखाच याला प्रतिसाद दिला.

हे नवीन नियम काल दिनांक ४ मे पासून लागू झाले आणि काल पुणेकरांनी रस्त्यावर प्रचंड गर्दी केली. असेच चित्र आजही पुण्यामध्ये दिसून आले. संचेती चौकामध्ये तसेच स्वारगेटच्या काही भागांमध्ये ही गर्दी दिसून आली. याबरोबरच पुण्यात इतर ठिकाणीही वाहनांची रहदारी सुरू होती. सूट देण्यात आली असली तरी नागरिकांनी केवळ जीवनावश्यक गोष्टींसाठीच बाहेर पडणे अपेक्षित आहे परंतु या नियमाचे कोठेही पालन झालेले दिसले नाही.

मुरलीधर मोहोळ यांचा लॉक डाउन शिथिलतेला विरोध:

पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी लॉकडाऊनला दिलेल्या शिथिलतेला विरोध केला आहे. लॉकडाऊन पूर्वीप्रमाणेच सुरू ठेवा अन्यथा धोका आहे अशी भीती त्यांनी व्यक्त केली आहे. केवळ अत्यावश्यक सेवा या १० ते २ या वेळेत सुरू ठेवण्याची मागणी त्यांनी केली आहे. या निर्णयामुळे पुण्यातील रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर गर्दी होत आहे. याच्या पार्श्वभूमीवर महापौर मोहोळ यांनी पालकमंत्री अजित पवार यांच्याशी चर्चा केली आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा