भगवान बुद्धांच्या विचारांनी मानव जातीचे कल्याण शक्य : अजित पवार

मुंबई, दि.७ मे २०२० : “भगवान गौतम बुद्धांनी सांगितलेल्या दया, क्षमा, शांती, त्याग, सेवा, समर्पणाच्या विचारांमध्येच अखिल मानवजातीचं कल्याण सामावलं आहे. हे विचारच मानवाचं जीवन अखंड प्रकाशमय करत राहतील”, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भगवान गौतम बुद्धांना अभिवादन केले.

यावेळी अजित पवार म्हणाले की, समाजातील दु:ख, अज्ञान, अन्याय, अहंकार दूर व्हावा यासाठी भगवान बुद्धांनी केलेले कार्य अलौकिक असे आहे. संपूर्ण मानव जातीला त्यांनी अहिंसेचा, दयेचा, करुणेचा संदेश दिला. आज जगावर कोरोनासारखे संकट असताना मानव जातीला वाचवण्यासाठी सलोखा, सहकार्याचं वातावरण निर्माण करण्याची ताकद भगवान बुद्धांच्या विचारांमध्ये आहे.
भावी पिढीला जगण्यासाठी आदर्श वातावरण देण्यासाठी भगवान बुद्धांचे विचार मार्गदर्शक ठरतील, असा विश्वासही उपमुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी:

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा