पुण्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या २,३२९ वर

पुणे, दि. ७ मे २०२० : पुण्यामध्ये कोरोनाचे २९ नवे रुग्ण सापडले आहेत. रोजच्यारोज हा आकडा पुण्यामध्ये वाढत आहे. असा एकही दिवस नसतो की ज्या दिवशी पुण्याच्या आकड्यांमध्ये भर पडलेली नाही. मध्यरात्रीनंतर २९ नव्या रुग्णांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. रात्री अकरापर्यंत पुणे जिल्ह्याची रुग्ण संख्याही २,३०० एवढे होती जी आज सकाळपर्यंत २,३२९ एवढी झाली आहे. आतापर्यंत पुण्यात १३२ रुग्णांचा मृत्यू देखील झाला आहे.

काल दिवसभरात जिल्ह्यामध्ये ९९ नावे रुग्ण सापडले होते त्यामुळे जिल्ह्याची आकडेवारी २३०० वर गेली होती. याच बरोबर काल दिवसभरात पुणे जिल्ह्यामध्ये ७ रुग्णांचा मृत्यू झाला होता. त्यामुळे मृत्यूचाही आकडा १३२ वर गेला होता. हे सात ही रुग्ण ससून हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होते त्यापैकी चार पुरुष आणि तीन महिला होत्या. हे सात ही रुग्ण वयाच्या साठ वर्षाच्या पुढील होते, बरोबरच त्यांना मधुमेह किंवा रक्तदाब यांसारखे इतर आजारही असण्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली. यात दिलासादायक बातमी अशी की काल दिवसभरात ५२ रुग्णांना उपचार करून घरी सोडण्यात आले आहे.

पुण्यामध्ये रविवार पेठ हा सर्वात जास्त हॉटस्पॉट असलेला भाग आहे. भवानी पेठ आणि रविवार पेठ या दोन पेठांमध्ये जवळजवळ ४३३ रुग्ण आढळून आलेले आहेत. याच भागामध्ये मृतांचा आकडा देखील सर्वात जास्त असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे पुण्यातील पेठांवर प्रशासनाकडून जास्त लक्ष पुरविले जाते आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा