बारामती, दि.७ मे २०२०: कोरोनाच्या लढ्यात ‘रिस्क’ घेऊन सेवा देणाऱ्या रुग्णवाहिका चालकांचा विमा उतरवा, अशी मागणी भाजप युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष गजानन वाकसे यांनी केली आहे. याबाबत वाकसे यांनी पुणे जिल्हा परीषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांबरोबर चर्चा करणार असल्याचे सांगितले.
यावेळी वाकसे यांनी सांगितले की, पुणे जिल्हा वाहनचालक कर्मचारी संघटनेच्या वतीने हे पत्र दिले आहे. कंत्राटी रुग्णवाहिका वाहनचालक वर्गाचा आरोग्य कर्मचारी म्हणून उल्लेख होत नाही. आरोग्य सेवा करत असून देखील आम्हाला दुजाभाव दिला जातो, आम्हाला आरोग्य कर्मचारी म्हणले जात नाही असे वक्तव्य संघटनेच्या वतीने करण्यात आले आहे. सध्या कोरोनाच्या महाभयंकर आजाराच्या काळात देखील या रुग्णवाहिका चालकांना विमा संरक्षण कवच नाही. तसेच प्रोत्साहन भत्ताही मिळत नसल्याबाबतचे पत्र दिले आहे.
याबाबत विरोधी पक्षनेत्यांसह मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना ईमेलद्वारे मागणी करण्यात आली आहे. त्यांच्याकडे रुग्णवाहिका चालकांची मागणी पोहोचविण्यात आली आहे.
या चालकांचा प्रत्यक्ष रुग्णांबरोबर संपर्क येतो. त्यामुळे त्यांचा विमा असणे अत्यंत आवश्यक आहे. हे चालक कंत्राटी असल्यामुळे यांचा विमा कोणी उतरवायचा या वादात विम्याचा लाभ यांना मिळाला नाही. हे खूप भयंकर आहे. याचबरोबर जिल्हा परिषद परिचर संघटना देखील विमा योजनेपासून वंचित आहे. याचा पाठपुरावा करणार असल्याचे वाकसे यांनी सांगितले.
न्युज अनकट प्रतिनिधी: अमोल यादव