कर्जत,९ मे.२०२०: देशात ताळेबंद मुळे सामान्य माणसाला अनेक ठिकाणी प्रश्नाना तोंड द्यावे लागत आहे. कर्जत तालुक्यात येजा जा करणा-यांची संख्या जास्त आहे. कर्जत येथे बॅक, दवाखाने, शेतीला लागणारे साहित्य या साठी येना-या नागरिकांची उपासमार होते. जर नागरिकांना हे बॅंकेच्या कामासाठी आलेला असेल तर त्याला तासोंतास ऊणात विना अन्न पाण्याचे लाईन मध्ये थांबावे लागते.
म्हणून कर्जत नगरपंचायतच्या नगरसेविका सवता परिषदेच्या महाराष्ट्र राज्य महिला अध्यक्षा सौ. मनिषा सोनमाळी यांनी कर्जत जामखेड विधानसभा मतदार संघाचे आमदार रोहित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली कर्जत येथील छञपती चौकात सकाळी ९ ते ११ या वेळत आमदारांच्या हास्ते साहेब अल्पोपहारची नव्याने सुरूवात केली असुन.
या ठिकाणी खिचडी, लापशी शिरा व उपिट मिळतं आहे. आशी माहिती नगरसेविका सोणमाळी यांनी दिली. या वेळी सवता परिषदेचे तालुका अध्यक्ष नाथाशेठ गोरे, शब्बीर पठाण, डाॅ. भंडारी आदि मान्यवर उपस्थित होते.
न्यूज अनकट प्रतिनिधी: जयहिंद पौरष