सायन रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ.प्रमोद इंगळे यांची उचलबांगडी

मुंबई, दि.९ मे २०२० : राज्यातील कोरोनाचे हॉटस्पॉट बनत असलेल्या मुंबईत कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. काही दिवसांपूर्वी माध्यमांवर सायन रुग्णालयात मृतदेहा शेजारीच कोरोनाग्रतांवर उपचार सुरु असल्याचा एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. या प्रकरणाची सरकारने गंभीर दखल घेतली असून सायन रुग्णालयाचे अधिष्ठाता प्रमोद इंगळे यांची उचलबांगडी करण्यात आली आहे.त्यांच्या जागी आता डॉ. रमेश भारमल हे सायन रुग्णालयाचे नवे अधिष्ठाता म्हणून काम पाहणार आहे.

मुंबई महापालिकेच्या आयुक्तपदावरून नुकतीच  प्रवीण परदेशी यांची हकालपट्टी करण्यात आली होती. त्यानतंर आता सायन रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. प्रमोद इंगळे यांची उचलबांगडी करण्यात आली आहे. डॉ. रमेश भारमल हे चोवीस तास सायन रुग्णालयात उपलब्ध राहणार आहेत. डॉ. भारमल यांच्यावर कुपर रुग्णालय आणि एच. बी. टी मेडिकल कॉलेज यांच्यावर लक्ष ठेवण्याची देखील जबाबदारी देण्यात आली आहे. मात्र डॉ. प्रमोद इंगळे यांना त्यांच्या जुन्या विभागात पाठवण्यात आले आहे.

न्युज अनकट प्रतिनिधी:

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा