पिस्तूल घेऊन फिरणाऱ्या तिघांना पोलिसांनी घेतले ताब्यात

6

कदम वाकवस्ती, दि. ११ मे २०२०: येथे ( दि.१०) रोजी मध्यरात्री गावठी पिस्तूल घेऊन फिरणार्‍या तिघांना लोणी काळभोर पोलिसांनी बेड्या ठोकल्या व त्यांच्या कडून एक गावठी पिस्तुल, आठ जिवंत काडतुसे, एक रिकामी मॅगझीन जप्त करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, याप्रकरणी फिरोज महंमद शेख ( वय २५ ), आनंद महादेव चव्हाण ( वय २३ ) व निलेश नागेश जेटीथोर ( वय २२ ) रहाणार तिघेही कदमवाकवस्ती यांना लोणी काळभोर पोलिसांनी अटक केली आहे.

फिरोज शेख हा अट्टल गुन्हेगार असून, तो त्याच्या दोन मित्रासह कमरेला पिस्तूल लावून लोणी स्टेशन परिसरात फिरत असल्याची माहिती पोलीस उपनिरीक्षक शिवाजी ननवरे यांना मिळाली असता या माहितीच्या आधारे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सूरज बंडगर यांच्या मार्गदर्शनाखाली शिवाजी ननवरे, पोलीस शिपाई परशूराम सांगळे, लोकेश राऊत यांनी लोणी स्टेशन परिसरात सापळा रचला यात फिरोज शेख, आनंद चव्हाण व निलेश जेटीथोर हे तीन आरोपी सापडले. त्यांच्या कडून २८,६०० रुपयेचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पुढील तपास लोणी काळभोर पोलीस करत आहेत.

न्यूज अनकट प्रतिनिधी – ज्ञानेश्वर शिंदे