मुंबई – भारतीय क्रिकेट नियामक मंडळाची (बीसीसीआय) निवडणूक आता येत्या २३ ऑक्टोबर राेजी हाेणार आहाे. या मंडळाच्या नेतृत्वाची धुरा माजी कर्णधार साैरव गांगुलीकडे देण्याचे जवळपास निश्चित झाले आहे. त्याने साेमवारी अध्यक्षपदासाठीचा उमेदवारी अर्ज दाखल केला. या पदासाठीचा त्याचा हा एकमेव अर्ज आलेला आहे. त्यामुळेच यासाठी त्याची या पदी बिनविराेध निवड हाेण्याचे चित्रही सध्या स्पष्ट झालेले आहे. त्याला सर्वच राज्यांच्या क्रिकेट संघटनांनी समर्थन दिले आहे.
तसेच बीसीसीआयच्या सचिवपदी जयेश शहाने आपला अर्ज दाखल केला. त्यांचीही निवड बिनविराेध हाेण्याची शक्यता आहे. कारण या पदासाठीही अद्याप शाह यांचाच एकमेव अर्ज आलेला आहे. जयेश हे केंद्रीय मंत्री अमित शहा यांचे चिंरजीव आहेत.
साैरव गांगुली आणि जयेश शहा हे दाेघेही आता आगामी १० महिन्यांपर्यंत आपापल्या पदावर कार्यरत राहणार आहेत. हे दाेघेही २०१४ पासून राज्याच्या संघटनेवर आहेत. त्यांनी गत पाच वर्षांपासून या पदी विराजमान हाेण्यासाठीची फिल्डिंग लावून ठेवली हाेती. जयेशवर वडील अमित शहाचा राजकीय हस्ताची चर्चा आहे.
प्रथमश्रेणी क्रिकेटपटूंना आर्थिक पाठबळ देणार : गांगुली
१. प्रथम श्रेणी क्रिकेट खेळणाऱ्या क्रिकेटपटूंना आर्थिक स्वरूपात माेठी मदत करण्याची याेजना आहे. यासाठी मी सातत्याने तीन वर्षांपासून चर्चा करत आहे.
उद्देश : आतारणजी खेळणाऱ्या क्रिकेटपटंूना प्रत्येक सामन्यासाठी ३ लाख रुपये मिळतात. वनडेसाठी ३५ हजार व टी-२० साठी ३५ हजारांचे मानधन मिळते. आता याच माेठी वाढ हाेण्याची शक्यता वर्तवली जात आहेे.
२. गत तीन वर्षांपासून मंडळाची प्रतिष्ठा घसरली आहे, इतर परिस्थितीही डबघाईस आलेली आहे, अशात मी अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारत आहे.
उद्देश : सीओएचेे चेअरमन विनोद राॅय आणि सदस्य डायना एडुलजी यांच्यात अनेक मुद्द्यावरून मतभेद आहेत. तसेच लाभाच्या पदावरून सचिन, गांगुली, द्रविडसारख्या दिग्गज खेळाडूंना तातडीने नाेटिसा पाठवण्यात आल्या आहेत.
३. अध्यक्षपदी वविराजमान हाेण्याचा मी स्वप्नातही विचार केला नाही. ब्रजेश यांच्या नावाला माझी पसंती हाेती. कारण यापदी अनेक दिग्गज हाेते.
उद्देश : जगमोहन दालमिया तीन वेळा अध्यक्षपदी विराजमान हाेते. त्यांच्या नेतृत्वाखाली बीसीसीआयची आर्थिक स्थिती अधिक मजबूत झाली. त्यांनी काेट्यवधी रुपयांचा महसूल मिळवून दिला आहे.
खेळाडूकडे मंडळाच्या नेतृत्वामुळे क्रिकेटची प्रगती हाेईल वेगाने
सौरव गांगुली किंवा ब्रजेश पटेल हे दाेेघेही माजी क्रिकेटपटू आहेत. खेळाडू म्हणून त्यांनी मैदानावर अनेक संकटे आणि समस्यांचा सामना केलेला आहे. याचाच फायदा आता गांगुलीला मंडळाचे नेतृत्व करताना हाेईल. तळागाळातील आणि मैदानावरच्या समस्यांचा खेळाडूंना बसणारा फटका आता त्याच्या अधिक लवकरच लक्षात येईल. एका खेळाडूकडे मंडळाच्या नेतृत्वाची जबाबदारी साेपवण्याचा निर्णयही महत्त्वाचा आहे. त्यामुळे क्रिकेटची प्रगती आता वेगाने हाेण्यास मदत हाेईल. त्याने सुरुवातीलाच आपल्या प्रतिक्रिया देताना प्रथम श्रेणी क्रिकेटपटूंच्या बाबतीत महत्त्वाचा निर्णय घेण्याचे संकेत दिले आहेत.
श्रीनिवासन गटाच्या ब्रजेशकडे आयुक्तपद
मंडळाच्या माजी अध्यक्ष श्रीनिवासन यांनी आपला वरदहस्त असाच कायम ठेवला आहे. यातून त्यांनी आपल्याच गटाच्या एका व्यक्तीकरवी आपले वर्चस्व कायम ठेवण्याच्या हालचाली केल्या. यातूनच आता त्यांच्या गटाच्या ब्रजेश पटेल यांची आयपीएलच्या आयुक्तपदी निवड हाेण्याचे जवळपास निश्चित झाले आहे. त्यामुळेच त्यांचा मंडळावरचा आपला वचक याच्या माध्यमातून कायम ठेवणार आहे. ब्रजेश यांच्या नियुक्तीबाबतची अधिकृत अशी घाेषणा लवकरच हाेईल.
अशी कार्यकारिणी
> अध्यक्ष: सौरव गांगुली (बंगाल)
> सचिव: जयेश शाह (गुजरात)
> कोषाध्यक्ष: धूमल (हिमाचल)
> उपाध्यक्ष: महेश वर्मा (उत्तराखंड)
> सहसचिव: जयेश जॉर्ज (केरळ)