महाराणा प्रताप जयंती साधेपणाने साजरी

कर्जत, दि.११.मे.२०२०: कर्जत तालुक्यातील कोरेगाव येथे वीर शिरोमणी महाराणा प्रताप जयंती निमित्त राजपूत युवा प्रतिष्ठानच्या वतीने गरीब व गरजू व्यक्तींना अन्नधान्य वाटप करण्यात आले.

कोरेगाव ग्रामपंचायतीसमोर सरपंच काकासाहेब शेळके यांच्या हस्ते नारळ फोडून व महाराणा प्रताप यांच्या प्रतिमेचे पूजन करत अत्यंत साध्या पद्धतीने व कोणतीही मिरवणूक न काढता ही जयंती साजरी करण्यात आली.

यावेळी राजपूत युवा प्रतिष्ठानचे नगरचे हनुमंतसिंग परदेशी, माजी सरपंच शिवाजी फाळके माजी सरपंच गंगासिंह परदेशी, राष्ट्रवादी युवा अध्यक्ष विष्णू परदेशी, सोमनाथ परदेशी, हनुमंत मुरकुटे, जवान भैलुमे, ग्रामसेवक वेताळ भाऊसाहेब, आनंदसिंह परदेशीसर, सूर्यकांत कोरे, अभिजीत परदेशी, यांचेसह राजपूत युवा प्रतिष्ठानचे तालुका अध्यक्ष अमोलसिंह परदेशी, युवा नेते प्रफुल्ल परदेशी, भगवान परदेशी, पै. विजय परदेशी, सतपाल परदेशी, जयसिंह परदेशी, महेश परदेशी, सुरज परदेशी, आकाश परदेशी, पै. गणेश शेळके आदीसह अनेक युवक उपस्थित होते. यावेळी सरपंच काकासाहेब शेळके यांनी राजपूत युवा संघटनेचे कौतुक केले.

न्यूज अनकट प्रतिनिधी:जयहिंद पौरष

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा