खरी आई जरी नसली,
तरी रुग्णांची
काळजी घेतांना,
आईची सावली तुझ्यात दिसली,
ऐवढ्या मोठया संकटातही,
तुझ्या मनातील शांतता
मला जाणवली,
का लोक सांगतात की,
मंदिरातच देवी आहे,
मला खऱ्याखुऱ्या आयुष्यात
रुग्णसेवा करणाऱ्या
परिचारिकांमध्येही देवी
दिसून आली…
फुलांसारख्या कोमल हाती,
आदिशक्ती जणू वसली,
तुझे नयन पाहून,
रोगराई ही दूर पळाली,
ना उमटे शब्द,
तुझ्या या कर्तुत्वाची,
छाप मनी ठसली,
या पाहुन सशक्त स्त्रीला,
विश्वासाची दोरी मातृत्वाने
अजूनच घट्ट धरली,
जीवनाला माझ्या
किती गं उपकार तुझे,
जगी संकटी,
प्रत्येक मानवात,
तुझीच सावली दिसली..
भटक्या (मुसाफिर)