तुळापूर, दि.१४मे २०२० : स्वराज्याचे दुसरे छत्रपति धर्मवीर संभाजी महाराजांची जयंती आज (बुधवारी) रोजी मोठ्या प्रमाणत साजरी होऊ शकली नाही. कारण आज देशावर कोरोना सारख्या बलाढ्य शत्रू आक्रमण करत आहे, व दिवसें दिवस झपाट्याने कोरोना रुग्णांमध्ये वाढ होत आहे.
याच पार्श्वभूमीवर देशाच्या हितासाठी शासनाच्या नियमांचे पालन करून, आज छत्रपाती संभाजी महाराज यांच्या ३६३ व्या जयंती दिनानिमित्त शौर्यपीठ तुळापूर येथे लोकल डिस्टन्स पाळून व गर्दी न करता छत्रपती संभाजी महाराजांना हार घालून, मानवंदना देण्यात आली.
या वेळी शंभूराज्याभिषेक ट्रस्टचे कार्यध्यक्ष रामकृष्ण (आण्णा) सातव पाटील, स्वप्नील काळे, संतोष शिवले, शेखर पाटील यांच्या उपस्थिती छत्रपती संभाजी महाराजांना हार घालून मानवंदना देण्यात आली. असे भावनिक आव्हान “न्यूज अनकट” शी बोलताना शंभू राज्याभिषेक ट्रस्टचे कार्याध्यक्ष रामकृष्ण सातव पाटील, यांनी केले आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी- ज्ञानेश्वर शिंदे