आजचे राशिभविष्य

मेष : शुभ रंग : मोरपंखी | अंक : ७ नेहमीची कामे सुरळीत पार पडतील. प्रापर्टी विषयी रेंगाळलेली कामे पुन्हा मार्गी लागतील. पैशाची कमतरता भासणार नाही. प्रेमप्रकरणे मात्र गोत्यात आणतील.


वृषभ : शुभ रंग : पिस्ता | अंक : १ आज काहीशी आक्रमक वृत्ती राहील. तुमच्यात उच्च प्रतीचा आत्मविश्वास राहील. इतरांपेक्षा काही वेगळेच करून दाखवायची उमेद असेल. अती धावपळ टाळा.


मिथुन : शुभ रंग : क्रिम | अंक : ८ चांगली माणसे संपर्कात येतील. नव्या योजना उत्तम प्रकारे राबवता येतील. आज कामगारांना केलेल्या कष्टांचा योग्य मोबदला मिळेल. यशदायी दिवस.


कर्क : शुभ रंग : राखाडी | अंक : ३ आज तुम्ही कुठेही आपलीच मर्जी चालवायचा प्रयत्न कराल. अहंकारामुळे काही हितसंबंध दुरावण्याची शक्यता आहे. वाणीत मृदुता असणे अत्यंत गरजेचे आहे.


सिंह : शुभ रंग : डाळिंबी| अंक : ७ आज घराबाहेर वादविवादात सामंजस्याने घेणे गरजेचे आहे. भविष्यकाळाच्या दृष्टीने एखादी गुंतवणूक करण्याचा विचार कराल. आज रागावर ताबा हवा.


कन्या : शुभ रंग : जांभळा| अंक : ९ तुमच्यासाठी सगळा दिवस अनुकूल आहे. तुमचे कार्यक्षेत्रातील महत्व वाढेल. कर्ज प्रस्ताव मंजूर होतील. विरोधकही तुमचे वर्चस्व मान्य करतील.


तूळ : शुभ रंग : स्ट्रॉबेरी | अंक : ५ नोकरीत वरीष्ठ तुमच्यावर खूष असतील. बढतीच्या मार्गातील अडथळे आता दूर होतील. उच्चपदस्थ मंडळींना काही ठाम निर्णय घ्यावे लागणार आहेत.


वृश्चिक : शुभ रंग : भगवा | अंक : १ आज मनांत काही नकारात्मक विचार येण्याची शक्यता आहे. घरातील थोरांचे विचार समजून घ्यावे लागतील. तुम्हाला एकांत हवासा वाटेल.


धनू : शुभ रंग : सफेद | अंक : ४ आज तुमचे मनोबल कमीच असेल. मनाच्या द्विधा अवस्थेत महत्वाचे निर्णय टाळलेले बरे. स्पर्धकांना कमजोर समजून चालणार नाही. आज धाडस टाळा.


मकर : शुभ रंग : निळा | अंक : ३ आज वैवाहीक जिवनांतील काही जुन्या स्मृती मनास आनंद दंतील. व्यवसायांत भागिदारांशी सामंजस्य राहील. सकारात्मकतेने नव्या जबाबदाऱ्या पार पाडाल.


कुंभ : शुभ रंग : मोतिया| अंक : २ कामाच्या ठीकाणी हितशत्रूंचा उपद्रव वाढण्याची शक्यता आहे. आज बिनचूक काम करण्यास प्राधान्य द्यायला हवे. रूग्णांनी डॉक्टरांच्या सूचना पाळाव्यात.


मीन : शुभ रंग : नारिंगी| अंक : ६ कुटुंबातील सदस्यांत सामंजस्य राहील. नवोदीत कलाकारांना प्रसिध्दी मिळेल. खेळाडू स्पर्धा गाजवतील. गृहीणी आज स्वत:साठी वेळ काढतील.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा