बारामती, दि.१६ मे २०२०: बारामती शहराला शनिवारी (दि.१६) रोजी सायंकाळी ५ ते ६ या एकतास वादळी वाऱ्यासह पावसाने झोडपले. शहरात सुमारे एक तास पाऊस कोसळत होता . सायंकाळी साडे चार वाजल्यापासूनच शहरात सोसाट्याचा वारा सुटला. वादळी वाऱ्याने रस्त्यालगतच्या झाडांच्या फांद्या तुटून रस्त्यावर पडल्या.
सोसाट्याच्या वाऱ्यापाठोपाठ पावसाची सुरुवात झाली. सुमारे अर्धा तास पाऊस पडत होता. अवकाळी पावसाचा तडाखा शहर व तालुक्याला बसत आहे. हा पाऊस दिलासा देण्याऐवजी नुकसानकारकच ठरत आहे.
प्रचंड वादळी वारे व वीजांच्या कडकडाटामुळे भितीदायक स्थिती निर्माण झाली होती मात्र वाऱ्याचा वेग कमी झाल्याने जोरदार पावसाच्या सरी बसरसल्याने रस्त्यावर सर्वत्र पाणी साचले होते. या अवकाळी पावसाचा शेतकऱ्यांना फाटका बसत आहे.
सध्या शेतात असणाऱ्या डाळिंबाच्या बागा तसेच उन्हाळी पिके व पावसाळा सुरू होण्या आधीची मका व कडवळ ही पिके या पावसाने भुईसपाट झाली आहे. जर असाच पाऊस पडत राहिला तर पावसाळ्यात जनावरांच्या चाऱ्याचा दर वाढणार आहे. अशी चिंता शेतकऱ्यांनी व्यक्त केली.
न्युज अनकट प्रतिनिधी: अमोल यादव