ग्वाल्हेरमधील एका घरात भीषण आगीमुळे ३ मुले आणि ४ महिलांचा मृत्यू

मध्य प्रदेश, दि. १८ मे २०२०: मध्य प्रदेशातील ग्वाल्हेरमध्ये भीषण आगीची घटना समोर आली आहे. सोमवारी इंदरगंज भागात घराला आग लागली. या अपघातात तीन मुले आणि चार महिलांचा मृत्यू झाला आहे. अग्नीशामन दल आगीवर मात करण्याचा प्रयत्न करीत आहे. घटनास्थळी जिल्हादंडाधिकारी, पोलिस अधीक्षक आणि प्रशासनाचे उच्च अधिकारी पोहचले आहेत.

इंदरगंज भागात अज्ञात कारणांमुळे पेंट शॉपमध्ये भीषण आग लागल्याचे सांगण्यात येत आहे. दुकानाच्या वरच्या मजल्यावर दोन कुटुंबे अडकली. कुटुंबाच्या बचावासाठी पोलिसांकडून मोहीम राबविली जात होती. आता काही लोकांना बाहेर काढण्यात आले आहे. तसेच सात मृतदेहही बाहेर काढण्यात आले आहेत.

मृतदेहांपैकी तीन मृतदेह मुलांचे आहेत, तर चार मृतदेह महिलांचे आहेत. यासह बचावलेल्या व बाहेर काढलेल्या लोकांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगितले जात आहे. प्रसंगी अग्निशमन दलाची अनेक वाहने आगीवर मात करण्यासाठी प्रयत्न करीत आहेत.

असे सांगितले जात आहे की, मृतांचा आकडा १० पर्यंत पोहोचू शकतो. सध्या अधिकाऱ्यांकडून जखमींवर उपचार करण्यासाठी योग्य ती व्यवस्था केली जात आहे. त्यासोबतच मृतदेहांचे शवविच्छेदन प्रक्रिया सुरू केली आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा