आज आहे वर्ल्ड फूड डे

22
दरवर्षी 16 ऑक्टोबर हा दिवस जगभरात वर्ल्ड फूड डे म्हणून साजरा करण्यात येतो. आपण हेल्दी डाएटचा ऑप्शन स्विकारून आपण लाईफस्टाइलशी निगडीत अनेक आरोग्याच्या समस्या नक्कीच कमी करू शकता. 
 
यूनायटेड नेशन्सची संस्था FAO फूड अ‍ॅण्ड अ‍ॅग्रीकल्चर ऑर्गनायजेशनने काही टिप्स शेअर केल्या आहेत. त्यावर एक नजर…
 
  घरच्या जेवणाला प्रथम प्राधान्य द्या. त्यात तेलही कमी व ते पदार्थ हेल्दी असणे आवश्यक आहे. त्यामध्ये प्रिजर्वेटिव्स असू नये, त्यामध्ये समावेश करण्यात आलेले सर्व पदार्थ फ्रेश असावेत.
 
  दररोज फास्ट फूड, पॅकेज्ड फूड आणि प्रोसेस्ड फूड ऐवजी ताजी फळं आणि भाज्यांचा समावेश करा. डाळी खा, नट्स आणि ड्राय फ्रुट्स खा.
 
  वस्तू खरेदी करण्याआधी त्याचे फूड लेबल एकदा तपासून घ्या. तुम्ही खात असलेल्या पदार्थांमध्ये कोणत्या गोष्टींचा समावेश आहे? त्याचा तुमच्या आरोग्यावर कसा परिणाम होणार आहे? हे पाहून घ्या. 
 
 आहारात शक्य असेल तेवढं साखर, मीठ आणि अनहेल्दी फॅट्सचा कमी समावेश करा. अनसॅच्युरेटेड हेल्दी फॅट्सचा डाएटमध्ये समावेश करू शकता.
 
 आहारात हेल्दी ठरणाऱ्या ब्राउन पदार्थांचा समावेश करा. जसे कि, ब्राउन राइस, ब्राउन शुगर.
 
  मुलांच्या आहारात कलरफुल पदार्थांचा समावेश करा. त्यामध्ये गाजर, वाटाणे, कोबी, बिन्स, बिट यांसारख्या भाज्यांचा समावेश असावा.