गुन्हेगाराच्या स्वागतासाठी कार्यकर्त्यांची कारागृहाबाहेर गर्दी; ११जणांवर गुन्हा

पुणे, दि.२०मे २०२० : कोरोनाचा संसर्ग आटोक्यात आणण्यासाठी नागरिकांनी गर्दी करू नये, या गोष्टींवर पोलीस प्रशासनाकडून बारीक नजर ठेवली जात आहे. मात्र सोमवारी(दि.१८) रोजी रात्री खुनाच्या गुन्ह्यात येरवडा कारागृहात असलेल्या आरोपीची जामिनावर सुटका करण्यात येणार होती.मात्र त्याच्या स्वागतासाठी येरवडा कारागृहाबाहेर गर्दी करून सोशल डिस्टन्ससिंगचे तीन तेरा वाजविल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी ११ जणाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लाला ठुसे (वय ३९, रा. अष्टापुर, ता. हवेली), गणेश चोंधे (वय ३८, रा. महम्मदवाडी), गणेश काळे (वय ३० रा. वडगाव शेरी), सोपान मडके (वय २८, रा. काळेपडळ), शिरीष कारले (वय २६, रा. पारनेर, जि नगर), दादा गव्हाणे (वय २८) आणि योगेश गव्हाणे (वय २७, दोघे रा. ता. श्रीगोंदा, नगर) , नितीन सोडनवर (वय ३८, रा. बोरीपारधी ता. दौड), संतोष गव्हाणे (वय २८, रा. गव्हाणेवाडी श्रीगोंदा), अंकुश मललाव (वय ४० रा.येरवडा) आणि संदीप जगदाळे ( रा. करडे, ता. शिरूर) यांच्याविरोधात येरवडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलीस कर्मचारी सचिन रणदिवे यांनी फिर्याद दिली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये, यासाठी देशभरात  लॉकडाऊनमध्ये वाढ केली आहे. त्या पार्श्वभूमीवर शहरात संचारबंदीचा आदेशही लागू करण्यात आला आहे. दरम्यान, लोणीकाळभोर पोलीस ठाण्यात खून प्रकरणी दाखल गुन्ह्यात अटक केलेला आरोपी विष्णू यशवंत जाधव हा राविवारी रात्री येरवडा कारागृहातून जामीनावर सुटणार होता. त्यामुळे त्याला घेऊन जाण्यासाठी लोक कारागृहाबाहेर जमले होते. त्यामुळे सोशल डिस्टस्टिंगचे पालन न केल्याने हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

न्युज अनकट प्रतिनिधी:

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा