बीड जिल्ह्यात शिधापत्रिका नसली तरी मिळणार दोन महिने मोफत धान्य

बीड, दि.२० मे २०२०: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र लॉकडाऊनमध्ये हातावर पोट असणा-यांना सार्वजनिक वितरण व्यवस्थेतून धान्य पुरवले जात आहे. मात्र ज्यांच्याकडे शिधा पत्रिका नाहीत, किंवा ज्यांचा अन्न सुरक्षा योजनेत समावेश नाही अशा व्यक्तींना धान्य मिळणे अवघड आहे. त्यामुळे आता ज्यांच्याकडे शिधा पत्रिका नाही अशा व्यक्तींनाही मे आणि जून या दोन महिन्यात मोफत प्रतिव्यक्ती ५ किलो तांदूळ वाटप केला जाणार आहे.

बीड जिल्ह्यात दीड लाख व्यक्तींना याचा लाभ घेता येईल. अर्थात या याद्या जिल्हाधिकारी अंतिम करणार आहेत.
राज्य सरकारने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मजूर, गरीब आणि विस्थापितांना धान्य देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार आता शिधापत्रिका नसेल तरी दोन महिने प्रत्येकी ५ पाच किलो तांदूळ दिला जाणार आहे. ज्यांनी शिधापत्रिकेसाठी अर्ज केला आहे, पण शिधापत्रिका मिळालेली नाही , शिधापत्रिका आहे, पण कोणत्याही योजनेत समावेश नाही

विस्थापित मजूर अशा घटकांच्या याद्या जिल्हाधिकाऱ्यांनी अंतिम करायच्या आहेत. त्यानंतर स्वस्त धान्य दुकान निहाय अथवा केंद्र निहाय याद्या तयार करून तसे नियतं निश्चित करायचे असून त्यानंतर प्रत्येक केंद्रावर पुरेसे कर्मचारी नियुक्त करून धान्याचे वाटप करायचे आहे.
बीड जिल्ह्यात विविध योजनांचे १५ लाख ६७ हजार लाभार्थी आहेत. त्या तुलनेत १० % म्हणजे सुमारे दीड लाख लाभार्थ्यांना दोन महिने प्रतिमाह ५ किलो तांदूळ मोफत देण्याचे नियोजन केले जाणार आहे.
यासाठी बीड जिल्ह्याला ७८४ मेट्रिक टन इतके नियतं मंजूर करण्यात आले आहे.

न्युज अनकट प्रतिनिधी:

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा