पुणे, दि. २० मे २०२०: औंध मध्ये कोविड पॉझिटिव्ह रुग्ण सापडल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. तसेच संबंधित व्यक्ती एका मोठ्या सोसायटीत राहत असल्यामुळे त्या व्यक्ती पासून इतरांना संसर्ग होण्याचा धोका वाढला होता. दोन दिवसापासून प्रलंबित असलेल्या चाचण्यांचे अहवाल आज प्राप्त झाले आहेत. यामध्ये रुग्णाच्या संपर्कात आलेल्या इतर व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत.
काल संध्याकाळी (१९ मे) हे सर्व अहवाल येणे अपेक्षित होते परंतु काही कारणास्तव ते काल उपलब्ध होऊ शकले नाही. त्यामुळे सर्वांचाच जीव टांगणीला लागला होता. तथापि आज सर्वांचे अहवाल नकारात्मक आल्यामुळे औंध परिसरावर कोरोनाची असलेली भीती संपली आहे. औंध हा भाग आतापर्यंत कोरोना मुक्त होता. या घटनेनंतर औंध वर प्रतिबंध लादले जातील का ? असा मोठा प्रश्न नागरिकांसमोर उभा राहिला होता.
सर्व अहवाल निगेटिव्ह आल्यामुळे हा भाग पूर्वीप्रमाणेच निर्बंध मुक्त राहील मात्र लॉकडाऊन मधील सर्व नियम लागू राहतील.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे