कर्जत तालुक्यात विलगीकरण कक्षातील नागरिकांची तपासणी

कर्जत, दि.२१मे २०२०: कर्जत तालुक्यातील विलगीकरण कक्षातील नागरिकांची तपासणी करण्यात आली आहे. तालुक्यातील जवळपास सर्वच गावातील स्थानिक प्रशासनाने पुणे, मुंबई आणि इतर भागातून आलेल्या नागरिकांची सोय शाळेत करण्यात आली आहे.

सध्या शहरातून कर्जत तालुक्यात येणाऱ्यांची संख्या ही झपाट्याने वाढत चालली आहे. त्याचे कारण म्हणजे सरकारने आपल्या गावी जाण्यासाठी परवानगी पास स्वरूपात उपलब्ध करून दिली आहे. त्यामुळे सिध्दटेक, जलालपूर, भांबोरा, बांरडगाव, राशिन, अशा बराच तालुक्यातील महत्वाच्या गावात बाहेरून येण्याची संख्या ही वाढतानाच दिसत आहे.

बारडगाव सुद्रिक प्राथमिक आरोग्य केंद्राचे आरोग्य सेवक दिपक गुळवे यांनी सांगितले की, तालुक्यातील बऱ्याच गावात ग्रामपंचायतीने विलगीकरणात ठेवण्यात आलेल्या नागरिकांची संख्या ही हजारांच्यावर आहे.

प्रत्येक नागरिकाची दोन दिवसांनी तपासणी करण्यात येत आहे. त्यामुळे नागरिकांना जर काही लक्षणे दिसली तर त्यांना लगेच पुढील तपासणी करून घेतली जात आहे, अशी माहिती गुळवे यांनी यावेळी दिली.

न्यूज अनकट प्रतिनिधी : जयहिंद पौरष

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा