आज वादळ बाधित बंगाल-ओडिशाला भेट देणार मोदी

नवी दिल्ली, दि. २२ मे २०२०: पंतप्रधान नरेंद्र मोदी वादळ बाधित पश्चिम बंगालला आज भेट देणार आहेत . अम्फानमुळे राज्याच्या दक्षिणेकडील भागात होणाऱ्या नुकसानीचे आकलन करण्यासाठी पंतप्रधान मोदी शुक्रवारी बंगालमध्ये जातील. पंतप्रधान मोदी सकाळी १०.३० वाजता कोलकाता विमानतळावर दाखल होतील. यानंतर पीएम मोदी आणि ममता बॅनर्जी कोलकातासह उत्तर आणि दक्षिण २४ परगणा बाधित भागाचे हवाई सर्वेक्षण करतील.

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी गुरुवारी सायंकाळी पत्रकार परिषद घेत पंतप्रधान मोदींना राज्यात जाण्याचे आवाहन केले. काही तासांनंतर मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचे अपील स्वीकारून पंतप्रधान मोदींनकडून भेट देण्याचा निर्णय घेण्यात आला. पंतप्रधान मोदी आज पश्चिम बंगाल आणि ओडिशाचा दौरा करतील आणि परिस्थितीचा आढावा घेतील.

पीएम मोदी ओडिशाच्या दौर्‍यावर जातील

अम्फानच्या वादळामुळे ओडिशामध्येही नुकसान झाले आहे. तथापि, बंगालच्या तुलनेत कमी नुकसान झाले आहे. पंतप्रधान कार्यालयाच्या ट्विटनुसार पीएम मोदी ओडिशामध्ये झालेल्या नुकसानीचे हवाई सर्वेक्षणही करतील.

हा आहे पंतप्रधान मोदींच्या संपूर्ण दौ-याचा कार्यक्रम

• सकाळी १० वाजता कोलकात्याकडे प्रस्थान होईल

• यानंतर १०.४५ वाजता ते डम डम विमानतळावर पोहचतील

• सीएम ममता बनारतीसह चॉपरहून बशीरहाटला जातील

• ११.२० वाजता वादळ बाधित भागाचे हवाई सर्वेक्षण

• १.३० पंतप्रधान भुवनेश्वरला रवाना होतील

न्यूज अनकट प्रतिनिधी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा