‘माझं अंगण, रणांगण’! च्या माध्यमातून भाजपकडून सरकारचा निषेध

लोणी काळभोर, दि. २२ मे २०२०: कोरोनाचं संकट रोखण्यात राज्यातील ठाकरे सरकारला अपयश आल्याचं सांगत भाजपने आज राज्य सरकारविरोधात दंड थोपाटले आहेत. आज दि. २२ तारखेला ठाकरे सरकारविरोधात हवेली तालुक्यातील कदमवाक वस्ती भारतीय जनता पार्टी च्या समोर काळ्या फिती काळे झेंडे उंचावून अथवा काळे फलक हातात घेऊन ठाकरे सरकारचा निषेध नोंदवण्यात आला आहे.

यावेळी भाजपचे तालुका अध्यक्ष सुनील कांचन, भाजपा कामगार आघाडी पुणे जिल्हा अध्यक्ष चित्तरंजन गायकवाड, भाजपा कार्यकर्ते यांनी करोनाविरुद्धच्या लढ्यात राज्यातील महाविकास आघाडी सरकार पूर्णपणे अपयशी ठरलं आहे, त्यामुळे या सरकारला जागे करून प्रभावी काम करण्यास भाग पाडण्यासाठी भाजपाने महाराष्ट्र बचाव आंदोलन सुरू केले आहे.

निषेध नोंदवताना सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचं काटेकोरपणे पालन करून त्यांनी निषेध व्यक्त केला. तसेच केंद्राकडून आर्थिक पॅकेज मागणाऱ्यांनी राज्यातील जनतेसाठी अद्याप कोणतंही पॅकेज जाहीर केलं नाही, असे भाजपा हवेली तालुका अध्यक्ष सुनील कांचन यांनी सांगितले आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी – ज्ञानेश्वर शिंदे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा