नवी दिल्ली, दि.२३ मे २०२०: उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी विद्यापीठ अनुदान आयोगाने आनंदाची बातमी दिली आहे. आता आययुजीसी मार्फत एकाच वेळी दोन वेगवेगळ्या शाखांमधील पदवी अभ्यासक्रमांना प्रवेश घेता येणार आहे. यासाठी विद्यापीठ अनुदान आयोगाकडून ( UGC) सशर्त मंजूरी देण्यात आली आहे.
याबाबत युजीसीची नुकतीच बैठक पार पडली. या बैठकीत या दोन डिग्री प्रस्तावाला मान्यता देण्यात आली. त्यामुळे याचा फायदा देशातील कोट्यवधी विद्यार्थ्यांना मिळणार आहे.
याबाबत युजीसीचे सचिव रजनीश जैन यांनी एका वृत्त संस्थेला याबाबत माहिती दिली आहे. यावेळी त्यांनी म्हटले आहे की, ‘यूजीसीने हा निर्णय भारतीय विद्यार्थ्यांसाठी घेतला आहे. आता विद्यार्थी एकाच वेळी दोन वेगवेगळ्या शाखांचे दोन भिन्न पदवी अभ्यासक्रम करू शकतात. दोन्ही पदवी पूर्णपणत: वैध असतील. युजीसी सेक्रेटरींनी एकाच वेळी दोन पदवी अभ्यासक्रमांच्या काही नियमांची माहिती दिली आहे. ही सुविधा फक्त महाविद्यालय आणि विद्यापीठ स्तरावर शिकणार्या विद्यार्थ्यांसाठी असेल असे त्यांनी म्हटले आहे.
युजीसीचे उपाध्यक्ष भूषण पटवर्धन यांच्या अध्यक्षतेखालील समितीने गेल्या वर्षी या विषयावर प्रस्ताव मांडण्यात आला होता. यापूर्वी २०१२ मध्ये अशी समिती स्थापन केली गेली होती. पण त्यावेळी या योजनेस मंजुरी मिळाली नव्हती.
जर तुम्ही एकाच वेळी दोन पदवी अभ्यासक्रम शिकत असाल तर त्यापैकी फक्त एकच पदवी नियमित स्वरूपात असेल. दुसरा अभ्यासक्रम तुम्हाला ऑनलाईन डिस्टन्स लर्निंग मोड (ओडीएल – ऑनलाईन डिस्टन्स लर्निंग) वर करावा लागेल. तुम्ही कोणत्या कोर्सचा अभ्यास करू इच्छित आहात हा पूर्णपणे तुमचा निर्णय असेल. या संदर्भातील सविस्तर मार्गदर्शक सूचना व नियमांची माहिती लवकरच अधिकृत अधिसूचनेसह प्रसिद्ध केली जाईल.अशी माहिती युजीसी कडून देण्यात आली आहे.
न्युज अनकट प्रतिनिधी: