नवी दिल्ली, दि. २३ मे २०२०: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज श्रीलंकेचे राष्ट्राध्यक्ष गोताबाया राजपक्षे यांच्याशी, सध्याची कोविड-१९ महामारी आणि या महामारीचे प्रदेशातल्या आरोग्य आणि अर्थव्यवस्थेवर होणा-या संभाव्य परिणामाबाबत दूरध्वनीद्वारे चर्चा केली.
या महामारीचा परिणाम कमी करण्यासाठी भारत, शक्य ती सर्व मदत श्रीलंकेला पुरवतच राहील असे आश्वासन पंतप्रधानांनी दिले.
आर्थिक घडामोडी पुन्हा सुरु करण्यासाठी त्यांच्या सरकारने उचललेल्या पावलाविषयी राजपक्षे यांनी पंतप्रधानांना माहिती दिली. भारताच्या मदतीने श्रीलंकेत सुरु असलेल्या विकास प्रकल्पांना गती देण्याच्या गरजेवर दोन्ही नेत्यांनी सहमती दर्शवली. श्रीलंकेत, भारतीय खाजगी उद्योगांकडून गुंतवणुकीला चालना आणि मूल्यवर्धन याबाबतच्या शक्यतेवर ही या नेत्यांनी चर्चा केली. श्रीलंकेतल्या जनतेच्या आरोग्य आणि कल्याणासाठी पंतप्रधानांनी शुभेच्छा दिल्या
न्यूज अनकट प्रतिनिधी