शिरूर, दि.२३मे २०२०:सध्या लॉक डाऊनच्या काळात सर्व उद्योगधंदे बंद करण्यात आले आहेत. यातच हातावर पोट असणाऱ्या छोट्या व्यावसायिकांवर उपासमारीची वेळ आली आहे.
शिरुर तालुक्यातील मलठण व आमदाबाद फाटा या दोन गावातील नाभिक समाजातील नागरिकांवर उपासमारीची वेळ आली आहे. यासाठी शिरूर तालुका मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष संजय बारहाते यांनी सामाजिक बांधिलकी जपत मलठण वआमदाबाद फाटा या दोन गावातील १८ नाभिक व्यवसाय करणाऱ्या गरजु कुटुंबांना जिवनाश्यक वस्तुचे किट वाटप करण्यात आले.
यावेळी नाभिक संघटनेचे जेष्ठ मार्गदर्शक अर्जुन भाऊ शिंदे, शिरूर तालुका अध्यक्ष गणपत क्षिरसागर, खजिनदार बाळासाहेब गायकवाड, आदर्श शिक्षक दत्तात्रय जगताप, उद्योजक नाना भाऊ फुलसुंदर, दत्ता शिंदे , आदर्श शिक्षक माऊली नरवडे गुरूजी उपस्थित होते.