लातूर, दि.२५ मे २०२०: लातूर जिल्ह्यात तापमानाचा पारा दिवसेंदिवस वाढताना पहायला मिळत आहे. त्यामुळे तापमानाचा पारा सातत्याने वाढतच आहे.आजचे तापमान नेहमी पेक्षाही जास्त होते. यावर्षी मे महिन्यात लातूरचे तापमान ४० अंशापेक्षा जास्तच आहे. महिन्याभरात सर्वाधिक म्हणजे ४४ अंशापर्यंत तापमान पोहचले होते.
लातूरमध्ये गेल्या ४ दिवसात सर्वाधिक तापमानाची नोंद होत आहे. दुपारी ३ ते ५ ही वेळ दिवसभरातील सर्वाधिक तापमानाचे तास ठरत आहेत.
कोरोनाचा प्रकोप सुरू असतानाच तापमानात वाढ होत असल्याने नागरिकांना उकाड्याने हैराण झाले आहे.लातूर जिल्ह्यातील सर्वाधिक तापमान ४४ अंशापर्यंत पोहचले होते.लातूरमध्ये १ मे रोजी तापमान ४१ अंश होते. २ मे ते ५ मे पर्यंत तापमान ४३ अंश होते.
६ ते ८ मे दरम्यान तापमान ४४ अंशापर्यंत वाढले होते. तर ९ मे रोजी तापमानात घट झाली आणि ते ४२ अंशावर आले. १० आणि ११ मे रोजी तापमानात पुन्हा घट होऊन ते ४० अंशावर स्थिर झाले होते. २२ ते २४ मे या काळात पुन्हा तापमान ४४ अंशापर्यंत वाढले आहे.
तापमानातील वाढ ३० मे पर्यंत कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.
न्युज अनकट प्रतिनिधी: