बीड, दि.२८मे २०२० : जिल्हा परिषदेचे सीईओ अजित कुंभार यांच्या कार्यपद्धतीवर विद्यमान सत्ताधार्यांसह विरोधकही नाराज असल्याचे समोर येत आहे. त्यामुळे सीईओ कुंभार यांच्याविरोधात अविश्वासाच्या हालचालींना वेग आला असून त्याला अनेक पदाधिकार्यांकडून दुजोरा देण्यात येत असल्याची महिती समोर येत आहे.
पूर्वीचे सत्ताधारी असोत की नवे दोन्ही काळात बीड जिल्हा परिषदेचे सीईओ अजित कुंभार यांचा काळ काहीसा तणावाचा ठरला आहे. प्रशासकीय कामात दिरंगाई असल्याच्या अनेकदा तक्रारी आहेत, अशाच स्वरुपाची तक्रार आता पुन्हा विद्यमान सत्ताधार्यांनी केल्याचे सांगण्यात येत आहे. याशिवाय ते पंचायत समित्यातही ते जास्तच हस्तक्षेप करत असल्याचाही आरोप केला जात आहे. हा विषय देखील बीड पंचायत समितीतील गटविकास अधिकार्यांच्या बदलीवरुन चव्हाट्यावर आला होता.
सध्या तरी पदाधिकार्यात चर्चा आहेत, याबाबतचा ठोस निर्णय झालेला नाही. सीईओ कुंभार यांच्याशी भ्रमणध्वनीवरुन संपर्क साधला, परंतु संपर्क होऊ न शकल्याने त्यांची प्रतिक्रिया समजू शकली नाही. अशी माहिती प्रतिनिधिकडून देण्यात आली आहे.
न्युज अनकट प्रतिनिधी: