पंढरपुर, दि.२९ मे २०२० : कोरोना विरोधात प्रशासकीय पातळीवर सर्वच अधिकारी आणि कर्मचारी आपला जीव धोक्यात घालून लोकांच्या सुरक्षेसाठी राबत आहेत. अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या हातात हात घालून गावोगावचे पोलिस पाटील देखील आपापल्या गावात कोरोनाला दूर ठेवण्याचा रात्रंदिवस प्रयत्न करीत आहेत.
कोरोना वॉरियर्सचा भाग ठरलेल्या तालुक्यातील पोलीस पाटील यांना मनसेचे प्रदेश सरचिटणीस दिलीप धोत्रे यांनी दोन लाख रुपयांच्या विम्याचे सुरक्षा कवच दिले आहे.
प्रांताधिकारी सचिन ढोले यांच्या उपस्थितीत तालुक्यातील सर्व पोलिस पाटीलांना फेसशिल्ड आणि सॅनिटायझरचे वाटप करण्यात आले. यावेळी तालक्यातील सुमारे ७० पोलिस पाटलांचा दोन लाख रुपयांची सुरक्षा विमा पॉलिसी काढण्याचे काम देखील सुरु करण्यात आले.
कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी सध्या आरोग्य अधिकारी,कर्मचारी, महसूल प्रशासन, पोलिस आणि गाव पातळीवरील ग्रामस्तरीय समित्यांच्या माध्यमातून कोरोना विषयी लोकांमध्ये जनजागृती करण्याचे काम करत आहेत.
यांच्या बरोबरच प्रत्येक गावातील पोलिस पाटलांची भूमिका देखील तितकीच महत्वाची ठरली आहे. मनसेच्या या उपक्रमाचे पोलीस पाटलांनी स्वागत केले आहे. आणि त्यांना धन्यवाद देखील दिले आहेत.
न्युज अनकट प्रतिनिधी